शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील चार वाईन शॉपवर दारूबंदी विभागाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुरातील दोन आणि नंदुरबार व शहाद्यातील प्रत्येकी एका वाईन शॉपची दारूबंदी विभागाच्या पथकांनी तपासणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुरातील दोन आणि नंदुरबार व शहाद्यातील प्रत्येकी एका वाईन शॉपची दारूबंदी विभागाच्या पथकांनी तपासणी केली असता त्यातील साठ्यात मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आल्याने या चारही शॉप चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात इतरही वॉईन शॉपची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेली अवैध दारू विक्रीमुळे दारू बंदी विभाग देखील चक्रावला आहे. ही दारू येते कुठून म्हणून तपासणी करण्याचे आदेश राज्यस्तरावरून देण्यात आले. त्यानुसार नाशिक व धुळे येथील पथक नंदुरबार जिल्ह्यात दाखल झाले होते. या पथकाने ठिकठिकाणच्या वाईन शॉपची तपासणी केली.नाशिक येथील पथक नंदुरबारात आले असता सोनी वाईन शॉप उघडण्यासाठी चालकाला बोलविण्यात आले. परंतु ते आलेच नाहीत. त्यामुळे पथक पुढील तपासणीसाठी निघून गेले. दुसऱ्या दिवशी अर्थात १ मे रोजी स्थानिक पथकाने अर्थात जिल्हा अधीक्षक युवराज राठोड यांच्या पथकाने या शॉपची तपासणी केली. तपासणी दरम्यान दारू साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर तफावत आढळून आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे सोनी वाईन शॉपच्या चालकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याशिवाय नाशिक येथील पथकाने नवापूर येथील दोन वाईन शॉपची देखील तपासणी केली. त्यात एस.एम.वाईन शॉप व एम.डी.वाईन शॉप यांचा देखील समावेश आहे. तेथेही मोठ्या प्रमाणावर दारू साठ्यात तफावत आढळून आली. त्या दोन्ही वाईन शॉप चालकांविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला.शहादा येथील आर.के.वाईन शॉपची देखील तपासणी करण्यात आली. तेथेही साठ्यात तफावत आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, दारू बंदी विभागासह स्थानिक पोलिसांनी देखील यापूर्वी शहरातील काही बारवर छापा टाकला असता तेथे अवैध दारू विक्री सुरू असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्याविरुद्ध देखील स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करून दारूबंदी विभागाने संबधीतांचे लायसन्स रद्द करण्याची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.