शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

टरबूज विक्रीतून साधला नफा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST

या प्रकल्पांतर्गत प्रात्यक्षिकामध्ये प्रत्येकवर्षी वेगवेगळे प्रयोग होत असतात. यामध्ये बदलत्या हवामानामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवणे वरचेवर जिकिरीचे होत आहे. या ...

या प्रकल्पांतर्गत प्रात्यक्षिकामध्ये प्रत्येकवर्षी वेगवेगळे प्रयोग होत असतात. यामध्ये बदलत्या हवामानामध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवणे वरचेवर जिकिरीचे होत आहे. या बदलत्या हवामानाचा जोखीमस्तर कमी करून उत्पन्न मिळविणे हे आगामी कालखंडात महत्त्वाचे आहे. याचाच भाग म्हणून उमराणी, भूजगाव, धनाजे, सूर्यफुल, शिवनीपाडा येथे (निक्रा) या प्रकल्पा अंतर्गत वेगवेगळे प्रयोग होत असतात.

या उन्हाळी हंगामामध्ये टरबूज लागवडीचा प्रयोग भूजगाव, ता. धडगाव येथील रमेश जिऱ्या पावरा यांच्याकडे घेतला. यामध्ये त्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाने दीड एकर क्षेत्रावर टरबूज या पिकाची लागवड केली आहे. टरबूज पिकासाठी वाणाची निवड, कीड व्यवस्थापन, खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन या विषयी ते सतत कृषी विज्ञान केंद्राशी संपर्कात होते. यामध्ये त्यांनी पिवळे-निळे चिकट सापळ्यांचा वापर केला, सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये त्यांनी बोरॉन १२:६१:०० तसेच १९:१९:१९ यांचा संतुलित वापर, विविध प्रकारचे पाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर, मल्चिंगचा वापर, फळमाशी इ. तंत्रज्ञानामुळे फळांची वाढ चांगली झाली व अपेक्षित उत्पन्न त्यांना मिळत आहे. परंतु कोविड परिस्थितीमुळे विक्रीची समस्या निर्माण झाली. त्यातून सुद्धा त्यांनी मार्ग काढला रस्त्याच्या बाजूस त्यांनी फळविक्रीचा स्टॉल लावला व विक्रीसाठी त्यांनी सोशल मीडियाचा वापर केला. याचा फायदा त्यांना झाला.

एकंदरीत कृषी विज्ञान केंद्राच्या निक्रा प्रकल्पामुळे टरबूज या पिकांतून त्यांना आर्थिक नफा मिळतो आहे. याचे अनुकरण करून गावातील वसंत पावरा, सुकलाल पावरा तसेच गणपत पावरा हे शेतकरी सुद्धा टरबूज विक्रीतून नफा मिळवत आहेत.