शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात दोन केंद्रांवर पावणेदोन लाख क्विंटल कापूस खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात नंदुरबार व शहादा येथील कापूस खरेदी केंद्रांवर एकूण पावणेदोन लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात ...

नंदुरबार : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात नंदुरबार व शहादा येथील कापूस खरेदी केंद्रांवर एकूण पावणेदोन लाख क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. यंदा मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कापूस खरेदी बंद करण्यात आली. यंदा किमान ४२०० ते कमाल ५६०० रुपये क्विंटलला भाव मिळाला होता.

नंदुरबार जिल्ह्यात सीसीआयचे नंदुरबार व शहादा येथे खरेदी केंद्र होते. बाजार समितींच्या माध्यमातून या ठिकाणी कापूस खरेदी केली गेली. नंदुरबारात दोन जिनिंग असून शहाद्यात पाच आहेत. दोन्ही ठिकाणी दरवर्षी सारखीच कापूस खरेदी केली जात असते. नंदुरबार येथील खरेदी केंद्रात जवळपास ९५ हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली. शहादा केंद्रात देखील ९० हजार क्विंटलच्या आसपास खरेदी केली आहे. कापसाला प्रतवारीनुसार यंदा किमान ४२०० ते कमाल ५६०० रुपये क्विंटलला भाव मिळाला. भाव चांगला असल्याने यंदा शेतकऱ्यांनी कापूस घरात पडू न देता लागलीच विक्री केली. दोन्ही ठिकाणी मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत खरेदी सुरू राहिली.

गेल्यावर्षी शेतकऱ्यांना मात्र वाईट अनुभव आला होता. भाव वाढेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्री केली नव्हती. त्यातच मार्च २०२० मध्ये लॅाकडाऊन सुरू झाला. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेकडो क्विंटल कापूस घरातच पडून राहिला. त्यामुळे शासनाला वेगळे आदेश काढून मे व जून महिन्यात पुन्हा कापूस खरेदी केंद्र सुरू करावे लागले होते. यंदा मात्र ती परिस्थिती उद्‌भवली नाही.