शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाने पुन्हा उडविली दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात दुस:या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात दुस:या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे अनेक भागातील पिकांचे नुकसान झाले. दरम्यान, नंदुरबार बाजार समितींमध्ये व्यापा:यांनी खरेदी केलेला मका पावसात सापडल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच लघु व मध्यम प्रकल्पांवर प्रशासनाने लक्ष ठेवले असून पाण्याची आवक वाढताच विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात दुस:या दिवशीही सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. दुपारी काही काळ उकाढा वाढला देखील होता. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मात्र अचानक पावसाला सुरुवात झाली. काही भागात तुरळक सरी होत्या तर अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस सुरू होता. साधारणत: अर्धा ते पाऊण तास पावसाचा जोर कायम होता. रात्री उशीरार्पयत पावसाची रिपरिप कायम होती. उभ्या पिकाचे नुकसानशेतात उभे असलेले कापूस, पपई, मका या पिकाचे या पावसामुळे नुकसान झाले. तर अनेक शेतक:यांनी सोयाबीन, बाजरी व इतर पिके काढून घेतल्याने त्यांचे नुकसान टळले. परंतु शेतात झाकून ठेवलेला शेतीमालाचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे. वेचणीवर आलेल्या कापसाला सर्वाधिक फटका बसला आहे. दोन दिवसांवर वेचणीसाठी असलेला कापूस या पावसामुळे पुर्णपणे भिजला असल्याने त्याचा काहीही उपयोग राहणार नसल्याची स्थिती आहे. यामुळे शेतक:यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. 25 लाखांचे नुकसाननंदुरबार बाजार समितीत शुक्रवारी लिलाव प्रक्रिया बंद होती. परंतु काही शेतक:यांनी शेतमाल विक्रीसाठी आणला होता. शेतक:यांनी आणलेला शेतीमाल व्यापा:यांनी खरेदी करावा असा आग्रह धरला. व्यापा:यांनी खरेदी करून तो खुल्या जागेत वाळत टाकण्यासाठी ठेवला. परंतु दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे खरेदी केलेला जवळपास दीड हजार क्विंटल मका पाण्यात सापडल्याने मोठे नुकसान झाले. सध्या पावसाचे वातावरण पहाता बाजार समितीतर्फे मंगळवार्पयत खरेदी-विक्री व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नंदुरबार बाजार समितीत शुक्रवारी लिलाव होणार नसल्याचे जाहीर करण्यात आलेले असतांनाही काही शेतक:यांनी मका विक्रीसाठी आणला होता. बाजार समितीने व्यापा:यांना आवाहन करून लिलाव करण्यास भाग पाडले. परंतु खरेदी केलेला मका उघडय़ावरच राहिल्याने दुपारी आलेल्या पावसात मका भिजून तो वाहून गेला. यामुळे व्यापा:यांच्या मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. सायंकाळी पाण्यात वाहणारा मका गोळा करण्यासाठी व्यापारी व हमालांची कसरत झाली. दरम्यान, पुढील सुचना होईर्पयत शेतक:यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजार समितीत आणू नये असे आवाहन बाजार समितीतर्फे सभापती किशोर पाटील व सचिव योगेश अमृतकर यांनी केले आहे. व्यापा:यांचा हिरमोडपावसाची रिपरिप आणि शेतक:यांचे झालेले नुकसान याचा फटका व्यापा:यांना बसला आहे. बाजारातील उलाढाल गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मंदावली आहे. शुक्रवारी तर बाजारपेठेत शुकशुकाट होता. आता तुळशी विवाहानंतर लगAसमारंभ सुरू होणार आहेत. त्यामुळे व्यापा:यांना आशा लागून आहे. परंतु वारंवारचा बेमोसमी पाऊस आणि शेतक:यांचे नुकसान यामुळे या सिझनवरही परिणाम होईल की काय अशी भिती व्यापा:यांना सतावत आहे. प्रकल्पांमधू विसर्ग सुरूजिल्ह्यातील शिवण, नागण व सुसरी प्रकल्पातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाऊस वाढला तर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झालेले आहे. नदी, नाल्यांचा प्रवास सुरूच असल्याने या प्रकल्पांमधून काही प्रमाणात विसर्ग सुरू आहेत. अनेक भागात पाऊस सुरू असल्याने पुन्हा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. मध्यम प्रकल्प असलेल्या शिवण नदीवरील विरचक प्रकल्पातून सद्य स्थितीत 50 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नागन प्रकल्पातून 35 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. सुसरीमधून विसर्ग सुरू नाही. परंतु पावसाचा जोर कायम राहिल्यास सुसरीचाही विसर्ग सुरू होणार आहे.  नदी, नाल्यांना पूर येवून पाणी या प्रकल्पांमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग कधीही वाढविण्यात येणार आहे. परिणामी जिल्ह्यातील सर्वच नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठावर आणि नाल्यांमध्ये अतिक्रमण केले असल्यास ते काढून घ्यावे. पाणी सुरू असतांना नदी, नाले ओलांडण्याचा प्रय} करू नये असेही आवाहन करण्यात आले आहे.