शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यात साडेसात एकरात अफूची शेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे यांना सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम भागात काही शेतकऱ्यांकडून अफूची शेती करण्यात येत असल्याची ...

उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे यांना सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अतिदुर्गम भागात काही शेतकऱ्यांकडून अफूची शेती करण्यात येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर आज रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास शहादा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण पवार व सुमारे वीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी तालुक्यातील म्हसावद शिवारातील शिरुड तह या गावाला सापळा रचून धाड टाकली. शिरुड तह हे गाव म्हसावदपासून आठ किलोमीटर तर फतेपूर व चिखली या गावापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर आहे अतिदुर्गम भागात असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना हाताशी घेऊन सुमारे साडेसात एकरात अफूची शेती करण्यात येत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे या संपूर्ण साडेसात एकरात आजूबाजूला मकई तर आतमध्ये पूर्ण तयार झालेले अफूचे पीक आढळून आल्यावर धाड टाकणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी आश्चर्यचकित झाले प्रशासनाचा डोळा चुकवून एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूची शेती करण्यात येत असल्याने ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनही अवाक झाले.

मिळालेल्या माहितीनुसार गावातील काका व पुतण्या यांच्या नावावर असलेल्या साडेसात एकर शेतात ही अफूची शेती केली जात होती काका पुतण्याकडून बाहेरून आलेल्या मेंढपाळ लोकांनी ही शेती भाडेकराराने घेतली असून तेच शेती करत असल्याची माहिती दोघा संशयितांनी पोलीस प्रशासनाला दिल्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात अफूचे पीक घेण्यामागे आंतरराज्यीय टोळीचा सहभाग असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.

संबंधित मेडपाळ कोठून आले, त्यांना अफूचे बियाणे कोणी उपलब्ध करून दिले, त्यांनी नेमके शिरूड तह या गावाची निवड कशी केली यामागील मुख्य सूत्रधार कोण असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून पोलीस प्रशासनाने याचा गांभीर्याने तपास करून मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई केली पाहिजे, पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण रात्रभर गावाची व आजूबाजूच्या परिसरातील शेतीची तपासणी करण्यात येत होती आजूबाजूच्या इतर शेतातही अफूची शेती करण्यात आली आहे का याचा शोध स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण रात्रभर घेतला जात आहे. सोमवारी सकाळी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत संपूर्ण शेतातील तयार अफूच्या पिकाची कापणी करण्यात येऊन त्याची मोजणी करण्यात येणार आहे त्यानंतर एकूण किती किलो अफू झाला याची माहिती मिळणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधीक्षक श्रीकांत घुमरे यांनी यावेळी दिली घटनेची माहिती मिळाल्यानंतर पत्रकारांनी याबाबत अधिक माहिती विचारण्यात असता पोलिसांनी त्यावर मौन बाळगले संशयितांना फायदा होऊ शकतो म्हणून पत्रकारांना घटनास्थळावर फोटो व व्हिडिओ शूटिंग करायला पोलिसांनी मनाई केल्याने पोलिसांनी आज दिवसभराच्या कारवाईत काय केले याचा खुलासा पोलीस प्रशासनाने केला नाही ताब्यात असलेल्या दोघा संशयितांची नावेही पोलिसांनी पत्रकारांना दिली नाही.

स्थानिक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून मेंढपाळांनी गावात वस्ती केली होती त्यांनी गावातील लोकांची शेती भाडेपट्ट्याने घेतली आहे या मेंढपाळांनी ही अफूची शेती केली असून त्यांना मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत साडेसात एकर शेतात तयार अफूचे पीक सापडले असून याचे स्थानिक बाजारपेठेत लाखोंच्या घरात किंमत असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची किंमत आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात शहादा तालुक्यात अफूची शेती पोलीस व महसूल प्रशासनाच्या डोळ्यात धूळ टाकून केली जात असल्याने या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार व यामागे असलेली आंतरराज्यीय टोळी याचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आव्हान पोलीस प्रशासनासमोर आहे.