शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

गणेश मंडळांचा पोलीस करणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळोद्यातील ज्या गणेश मंडळांकडून यावर्षी सामाजिक भान ठेवून व शासन नियमांचे पालन ...

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तळोद्यातील ज्या गणेश मंडळांकडून यावर्षी सामाजिक भान ठेवून व शासन नियमांचे पालन केले जाईल अशा गणेश मंडळांचा पोलीस प्रशासन प्रमाणपत्र देऊन गौरव करेल अशी माहिती अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी दिली़ तळोदा येथे शांतता कमिटीच्या बैठकीत त्यांनी मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिकांसोबत चर्चा करत ही माहिती दिली़
बैठकीला प्रांताधिकारी अविशांत पांडा, नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलीस उपविभागीय अधिकारी विक्रम कदम, तळोदा तहसीलदार पंकज लोखंडे, नगरसेवक गौरव वाणी, मुख्याधिकारी सपना वसावा, विद्युत वीज वितरण उपकार्यकारी अभियंता सचिन काळे, वंदना तोरवणे, पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक गवळी यांनी आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोरोना महामारीमुळे शासनाच्या परिपत्रकाप्रमाणेच घरीच उत्सव साजरा करावयाचा आहे. कोणत्याही मंडळाला मिरवणूक काढण्याची परवानगी नसेल गणपती विसर्जना दरम्यान फक्त दोन लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. दरवर्षी अनेक सार्वजनिक गणेश मंडळ हे सजावटीसाठी खर्च करत असतात परंतु यावर्षी कोणतेही स्वरुपाचे डेकोरेशन न करता आपण विधायक उप्रकम राबवत प्रशासनाला करावी आणि गणपती विसर्जन करण्यासाठी तळोदा नगरपालिकेने कृत्रिम तलाव तयार करावा असे सांगितले़ निसार मक्राणी, माजी उपनगराध्यक्ष अनुपकुमार उदासी, भाजपचे जगदीश परदेशी, जेष्ठ नागरिक रसिकलाल वाणी यांच्यासह तळोदा शहरातील अनेक गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन मुकेश कापुरे यांनी तर आभार पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांनी मानले.

बैठकीत गौरव वाणी यांच्याकडून शहरातील ज्या मंडळांकडून सोशल डिस्टन्सिंग व शासन नियमांचे पालन करुन गणेशोत्सव साजरा केला जाईल अशा मंडळांना पाच हजार रूपयांचे बक्षिस जाहिर करण्यात आल़ यातून मंडळांना साधेपणाने उत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे़