पोलीस पाटलाच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:26+5:302021-05-29T04:23:26+5:30

शहादा तालुक्यातील जावदे त.ह. येथील पोलीस पाटील चंद्रसिंग मोरे हे गेल्या सोळा महिन्यापासून कोरोना काळात प्रशासनाला खांद्याला खांदा लावून ...

Police demand sanugrah grant to Patla's family | पोलीस पाटलाच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

पोलीस पाटलाच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान देण्याची मागणी

शहादा तालुक्यातील जावदे त.ह. येथील पोलीस पाटील चंद्रसिंग मोरे हे गेल्या सोळा महिन्यापासून कोरोना काळात प्रशासनाला खांद्याला खांदा लावून आपले कर्तव्य बजावत होते. मात्र दुर्दैवाने त्यात त्यांची प्रकृती अचानक खराब झाली व कोरोनाची लागण झाली. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यास गेले असता बेड उपलब्ध नसल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दुर्दैवाने उपचार घेत असताना १५ एप्रिल २०२१ रोजी मृत्यू झाला. मात्र गेल्या दीड महिन्यापासून शासनाकडे ५० लाख रुपये विमा कवचं मिळण्याची तरतूद असूनही कुटुंबीय अद्यापही त्यापासून वंचित आहे.

त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असून दोन लहान मुले आहेत. प्रशासनाने कोरोना काळात पोलीस पाटलांसाठी विमा कवच सानुग्रह अनुदानाची ५० लाख रुपयांची रक्कम त्यांच्या कुटुंबीयांना त्वरित द्यावी, अशी मागणी पोलीस पाटील संघटनेतर्फे करण्यात आली आहे.

संघटनेतर्फे आर्थिक मदत

आपले कर्तव्य समजत शहादा तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने ११ हजार रुपयांची आर्थिक मदत मयत पोलीस पाटील चंद्रसिंग मोरे यांच्या कुटुंबीयांना त्यांच्या जावदे येथील घरी जाऊन देण्यात आली. या वेळी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, शहादा तालुका पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष गजेंद्र गोसावी, उपाध्यक्ष दीपक पाटील, दिलीप ठाकरे, गौतम खर्डे, मोहन रावताळे, सुभाष भिल, राजू भिल, सुनील भिल, दिनकर शेंमळे, योगेश पाडवी, रवींद्र ईशी, आत्माराम ठाकरे, मनोज भिल आदींसह पोलीस पाटील उपस्थित होते.

Web Title: Police demand sanugrah grant to Patla's family