शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१० पाड्यांमध्ये पाण्याची सुविधा नसल्याने ग्रामस्थांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूक ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत निगदींसह माथेपाडा, दफसल्यापादा, कांजणीपाडा, कुंड्यापाडा, दुमतीपाडा, पाटील पाडा, पुंजाऱ्यापादा, बारीपाडा, आवलीपाडा व ...

धडगाव तालुक्यातील मांडवी बुद्रूक ग्रुप ग्रामपंचायती अंतर्गत निगदींसह माथेपाडा, दफसल्यापादा, कांजणीपाडा, कुंड्यापाडा, दुमतीपाडा, पाटील पाडा, पुंजाऱ्यापादा, बारीपाडा, आवलीपाडा व वाहानिपादा असे १० पाडे येत असतात. परंतु आजही तेथे पायाभूत सुविधा नाहीत. एवढेच नव्हे तर या १० दुर्गम आदिवासी पाड्यांमध्ये साधे पिण्याचे पाणी नाही. गावातील रहिवाश्यांना पाण्यासाठी रोज पाड्यापासून एक किमी अंतरावरून पायपीट करत पिण्याचे पाणी आणावे लागत आहे. तेव्हाच गावकऱ्यांची तहान भागत असते. वास्तविक निगदीसह हे पाडे शासनाच्या पेसा क्षेत्रा अंतर्गत येत असतात. साहजिकच निधीदेखील मुबलक येत असतो, असे असताना ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, अशी व्यथा सुध्दा काही गावकऱ्यांनी बोलून दाखवली आहे. येथील पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सतत ग्रामपंचायत प्रशासनास अनेक वेळा अवगत केले आहे. शिवाय ग्रामसभेतही तसा ठराव केला आहे. परंतु मनमानी कारभारामुळे आमचा पाण्याचा व विकासाचा प्रश्न दुर्लक्षित राहिला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जिल्हा परिषद प्रशासनाने याप्रकरणी गंभीर दखल घेऊन पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पाडावासीयांनी केली आहे.

पेसाच्या खर्चीत निधीची चौकशी व्हावी

मांडवी ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या निगदी गावासह या १० पाड्यात अजूनही पायाभूत सुविधा पोहचलेल्या नाही. त्यामुळे ही गावे शासनाच्या शास्वत विकासापासून उपेक्षितच आहे. १४ वा वित्त आयोग व पेसाच्या निधीतूनसुद्धा विकास कामे झालेली नाहीत. ग्रामसभेत अनेकवेळा या गाव, पाड्यातील पाणी प्रश्न व अंतर्गत रस्त्यांची कामे घेण्याची मागणी केली आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व प्रशासन याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यांच्या मनमानी कारभारामुळे आम्ही गावकरी अक्षरशः हतलब झालो आहेत. मांडवी ग्रामपंचायतीस शासनाकडून मिळालेला पेसा आणि १४ वित्त आयोगाच्या खर्चीत निधीची चौकशी करावी, अशी मागणी जयसिंग पावरा, खेमा पावरा, शैलेंद्र झांगडे, मानसिंग पवार, राहुल पावरा, खेत्या पावरा, प्रताप पावरा, रूमा पाडवी यांनी केली आहे.

निगडी गाव या अंतर्गत येणाऱ्या १० पाड्यांमध्ये पायाभूत सुविधांबरोबरच पाण्याचा प्रश्न कायम आहे. मांडवी ग्रामपंचायतीत समावेश करण्यात आला आहे. ग्रामसभेत अनेकवेळा मागणी करून ठरावदेखील केला आहे. परंतु मनमानी कारभारामुळे आम्ही शास्वत विकासापासून उपेक्षित आहोत. जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी करून न्याय द्यावा. अन्यथा आमरण उपोषण छेडण्यात येईल. - जयसिंग पावरा, रहिवासी निगदी, ता.धडगाव