तरुणीचा विनयभंग करून मारहाण करणाऱ्यास दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:23 IST2020-02-11T13:22:58+5:302020-02-11T13:23:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण करणाºया युवकास न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. ...

 Penalty for beating a young woman for violating her | तरुणीचा विनयभंग करून मारहाण करणाऱ्यास दंड

तरुणीचा विनयभंग करून मारहाण करणाऱ्यास दंड

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तरुणीचा विनयभंग करून तिला मारहाण करणाºया युवकास न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. सोनारेदिगर, ता.नवापूर येथे ही घटना जून २०१६ मध्ये घडली होती.
पिढीत तरुणी तिच्या बहिणीसह शेतात जात असतांना विजय जितेंद्र वसावे याने त्यांचा रस्ता अडवून पिढीत तरुणीचा हात धरून तिला जबरीने दुचाकीवर बसण्यास सांगितले. तरुणीने न ऐकल्याने त्याने मारहाण केली होती. नवापूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हा खटला चालला. न्या.राजीव भरवाल यांनी विजय वसावे यास पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्यातील तीन हजार रुपये पिढीत युवतीस दिले जाणार आहेत. दोषारोपपत्र उपनिरीक्षक एस.एल.कदम यांनी सादर केले होते. सरकारी वकील अजय सरळकर यांनी काम पाहीले. पैरवी अधिकारी म्हणुन हवालदार प्रमोद पाठक होते.

Web Title:  Penalty for beating a young woman for violating her