शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

नवापुरात आरपीटीसीआर कीट संपल्याने रुग्णांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:31 IST

आरपीटीसीआर कीट नसल्याने कोरोना रॅपिड टेस्टिंग सुरू आहे. परंतु आरपीटीसीआर तपासणी होत नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना अडचणी येत ...

आरपीटीसीआर कीट नसल्याने कोरोना रॅपिड टेस्टिंग सुरू आहे. परंतु आरपीटीसीआर तपासणी होत नसल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांना अडचणी येत आहेत. जिल्हा प्रशासनाने यावर ठोस उपाययोजना करावी. तालुका प्रशासनाने अनेकवेळा कीटची मागणी केली. परंतु शनिवारी संध्याकाळपर्यंत नवापुरात कीट उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रुग्ण आरपीटीसीआर तपासणीच्या प्रतीक्षेत आहे.

नवापूर शहर महाराष्ट्र-गुजरात सीमावर्ती भागात असल्याने नवापुरात आरपीटीसीआर कीट संपल्याने रुग्णांना आरटीसीआर तपासणी करण्यासाठी शेजारील गुजरात राज्यात जावे लागत आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी सर्वात आधी आरपीटीसीआर तपासण्याची मागणी रुग्णालयात डॉक्टर करीत असल्याने रुग्णांकडे रॅपिड टेस्टिंग अहवाल असतो. काही खासगी व शासकीय रुग्णालयात आरपीटीसीआर टेस्ट नसल्याने रुग्णांवर तोपर्यंत कोरोनाचा उपचार केला जात नाही. यातून रुग्णांच्या जीवितास धोका होऊ शकतो. कोरोनाचा प्रादुर्भाव शरीरात वाढू शकतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ नवापूर शहरात आरपीटीसीआर कीट उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. नवापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या दोन दिवसांपासून आरपीटीसीआर कीटच्या प्रतीक्षेत आहे.

नवापूर तालुक्यातील कोरोना संशयित रूग्ण व नातेवाईकांची तपासणीसाठी नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयाच्या तपासणी केंद्रावर सकाळपासून मोठी गर्दी होत आहे. आरपीटीसीआर कीट नसल्याने तपासणीशिवाय घरी परतावे लागत आहे. लॉकडाऊन सुरू असल्याने रुग्णांना ग्रामीण भागातून नवापुरात तपासणीसाठी वाहने मिळत नसल्याने जादा पैसे देऊन रुग्णांना रिक्षा भाड्याने करून यावे लागत आहे. परंतु तपासणी होत नसल्याने खाली हात परत जावे लागत असल्याने वेळ व पैशांची नासाडी होत आहे. आरोग्य विभागाने शहरी भागासह ग्रामीण भागातही योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. जिल्हा प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी करोडो रुपये खर्च करून साहित्य खरेदी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना साहित्याची कमतरता ही नागरिकांच्या जीवावर बेतू नये याकडे जिल्हा प्रशासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

शेकडो रुग्ण आरपीटीसीआर तपासणीच्या प्रतीक्षेत

नवापूर तालुक्यात ७७९ रुग्ण पॉझिटिव्ह असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांच्या संपर्कातील अनेक रुग्ण कोरोना तपासणीच्या प्रतीक्षेत असून तात्पुरती का होईना रॅपिड टेस्ट केली जात आहे. परंतु रुग्णालयात उपचारासाठी गेले असता डॉक्टर आरपीटीसीआर टेस्टिंगची मागणी करीत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी अडचण निर्माण होते. आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करून नवापूर येथे आरपीटीसीआर कीट लवकर उपलब्ध करून द्यावी.

वाढीव बेडसोबत आरोग्य कर्मचार्‍यांची वाढ करावी

नवापूर तालुका कोरोना नियंत्रित करण्यासाठी डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचार्‍यांचा तुटवडा असल्याने याठिकाणी वाढीव आरोग्य कर्मचारी देऊन नवापूर तालुक्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. प्रशासनाने ऑक्सिजनयुक्त बेड वाढविले आहेत तसेच कोविड सेंटरची नवीन निर्मिती केली जात आहे. परंतु आरोग्य कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका यांचीही पुरेशा प्रमाणात नियुक्ती करण्याची गरज आहे अन्यथा कमी कर्मचाऱ्यांवर जास्त कामाचा लोड येऊ शकतो.

आरपीटीसीआर रिपोर्ट लवकर द्यावा

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरपीटीसीआर तपासणी यंत्रणेवर लोड येत असल्याने आरपीटीसीआर तपासणीचा अहवाल तब्बल दोन दिवस उशिरा येत असल्याने रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलंब होत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांनी नाराजी व्यक्त केली आहे.