शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

नवीन कक्षामुळे रुग्णांचा आला जीवात जीव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षातील वाढत्या अनागोंदी आणि तक्रारी लक्षात खामगाव रस्त्यावरील वसतिगृहात नवीन कोवीड ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षातील वाढत्या अनागोंदी आणि तक्रारी लक्षात खामगाव रस्त्यावरील वसतिगृहात नवीन कोवीड कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे रुग्णांच्या जीवात जीव आला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षातील स्वच्छता आणि इतर बाबी मात्र जैसे थे आहेत.खामगाव रस्त्यावरील एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील वसतिगृहात नवीन कोवीड कक्ष स्थापन करण्यात आला आहे. वसतिगृहाची नवीन इमारत असल्यामुळे अवस्था चांगली आहे. स्वच्छतागृहे, स्रानगृह यांची अवस्था चांगली आहे. परिसर मोकळा व विस्तीर्ण असल्यामुळे रुग्णांच्या मनस्थितीवरही सकारात्मक परिणाम होत आहे. या ठिकाणी कमी लक्षणे असलेल्या ४० रुग्णांना ठेवण्यात आले आहे.दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील कोवीड कक्षात जास्त लक्षणे असलेले आणि ५५ वर्षापेक्षा अधीक वय असलेल्या रुग्णांना ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी तक्रारीनंतर मात्र दोन दिवस स्वच्छतेला प्राधान्य देण्यात आले. नंतर मात्र पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होत आहे.या ठिकाणी स्रानगृहच नसल्यामुळे समस्या आहे. शिवाय पिण्याच्या पाण्याचा वापर देखील सर्वांना एकाच ठिकाणी करावा लागत असल्याचे चित्र आहे.