शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळातील रुग्णसेवेमुळे सकारात्मकता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डाॅ. लोचन पिंगळे ह्या मूळच्या जळगाव येथील आहेत. जळगावात वडिलांचे खादी ...

जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या डाॅ. लोचन पिंगळे ह्या मूळच्या जळगाव येथील आहेत. जळगावात वडिलांचे खादी भांडार आहे. घरातील पहिल्या डाॅक्टर असलेल्या डाॅ. लोचन ह्या २०१३ पासून राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात रुजू झाल्या. त्यांचे पती डाॅ. दीपक दुसाने हे ही कुढावद, ता. शहादा येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. यामुळे डाॅ. लोचन यांचा ग्रामीण भागासोबतचा दांडगा संपर्क आहे. रुग्णालयासोबतच त्या ग्रामीण भागात वेळोवेळी मोफत वैद्यकीय सेवाही देतात. गेल्या आठ वर्षांपासून त्या जिल्हा रुग्णालयाच्या बालरुग्ण तपासणी मोहीम पथकात सामील होतात. दुर्गम भागात बालकांच्या तपासण्या केल्यानंतर मातांना मार्गदर्शनही करतात. गेल्या सात महिन्यांपासून कोरोना वाॅर्डात सेवा देताना त्यांनाही अनेक कटू-गोड अनुभव आले.

मुलांना टाकून वाॅर्डात

डाॅ. पिंगळे यांचे सासर हे शहादा तालुक्यातील कुढावद येथील असल्याने त्या पती व मुलांसह तेथे वास्तव्यास आहेत. परंतु कोरोनाची ड्यूटी सुरू झाल्यापासून महिन्यातील १० दिवस त्या सरळ सेवा देण्यासाठी रुग्णालयात असतात. तर किमान चार दिवस क्वारंटाईन होतात. या काळात आठ वर्षाचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी या दोघांना आई म्हणून लांब ठेवणे जिकिरीचे होते. परंतु सासू-सासरे आणि पती यांच्या पाठबळामुळे त्या मुलांपासून लांब राहून काम करत आहेत. रुग्णालयात रात्री शिफ्ट ड्यूटीत काम करताना काही रुग्णांचा उद्धटपणा अनुभवण्यास आला. अशावेळी वरिष्ठ डाॅक्टर्स न येऊ शकल्यास रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अशा दोघांनाही समर्थपणे तोंड देत त्यांना शांत करून रुग्णसेवा सुरू ठेवण्यात त्या वेळाेवेळी यशस्वीही झाल्या. एखादा रुग्ण बेडवर नाही किंवा बाहेर गेला का, या चिंतेने रात्रभर झोपही न घेत ड्यूटी केल्याचा अनुभव त्यांनी यावेळी वाटून घेतला.

घरात वैद्यकीय व्यवसायाचा गंध नसताना आई-वडिलांना मी डाॅक्टरच होणार हे सांगणं थोड अवघड होतं पण.. ते समजून घेतील हे माहीत होतं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्यावर सेवा सुरू केल्यावर शहरी भागातून ग्रामीण भागात आल्यावर आपली खरी गरज इथेच आहे, हेच आपले क्षेत्र असा ठाण विश्वास झाला आणि कामाला लागले. आठ वर्षांपासून यातून नंदुरबार जिल्ह्यात काम करत आहे. कोरोना वाॅर्डातील रुग्णसेवेने वैद्यकीय सेवेला वेगळे वळण दिले असून महिला म्हणून खूप अनुभव गाठीशी आले.

कोरोना हा एक गंभीर आजार आहे. त्यावरील उपचार पद्धती ह्या उपलब्ध आहेत. प्रत्येक वैद्यकीय अधिकारी आपले प्राण पणाला लावून रुग्णाची सेवा करतो आहे. या सर्वात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कुटुंब हेच त्यांचे ऊर्जास्थान ठरले आहे. मुले लहान असल्याने त्यांच्यापासून लांब राहून सात महिने रुग्णांची सेवा करणे शक्य झाले ते कुटुंबाने दिलेल्या पाठबळामुळे

डाॅ. लोचन पिंगळे, जिल्हा रुग्णालय