लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शहर शाखेतर्फे दस:यानिमित्त पथसंचलन करण्यात आल़े मंगळवारी सकाळी झालेल्या या उपक्रमात स्वंयसेवक उपस्थित होत़े शहरातील माळीवाडा भागातून सकाळी पथसंचलन करण्यात आल़े यात स्वयसेवकांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवला़ छत्रपती शिवाजी महाराज नाटय़मंदिरात समारोप करण्यात आल्यानंतर याठिकाणी पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करण्यात आल़े कार्यक्रमात विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलींद परांडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केल़े त्यांनी उपस्थित स्वयंसेवकांना आनंद रामायण या गं्रथासंबधी माहिती देऊन विजयादशमी निमित्त सर्वानीच विषमतेविरुद्ध व परिवर्तनाच्या दिशेने सिमोल्लंघन करावे असे त्यांनी सांगितल़े
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}