चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:31 IST2021-05-26T04:31:01+5:302021-05-26T04:31:01+5:30

चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल येथे कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यात आलेले आहे. येथे दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांवर उपचार करण्यात आले. येथे रुग्णांना ...

Oxygen-producing plant in operation at Chinchpada Christian Hospital | चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट कार्यान्वित

चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट कार्यान्वित

चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटल येथे कोविड रुग्णालय कार्यान्वित करण्यात आलेले आहे. येथे दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णांवर उपचार करण्यात आले. येथे रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, म्हणून दानशूर व्यक्तींच्या लोक सहभागातून हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारा प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे.

या प्लांटद्वारे एका तासाला ३०० लीटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता आहे. १५० लीटर प्रति मिनीट तीस रुग्णांना पाच लीटरप्रमाणे ३६ जंबो सिलिंडर ऑक्सिजन तयार होईल, त्यामुळे येथे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ.दीपक सिंह यांनी सांगितले की, ऑक्सिजनची टंचाई भरून काढण्यासाठी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मिती प्लांट कार्यन्वित करण्यात आलेला आहे. रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही.

यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश मावची, उद्योजक विपिनभाई चोखावाला, भिकालाल अग्रवाल, सीताराम शर्मा, चिंचपाडा ख्रिश्चन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Oxygen-producing plant in operation at Chinchpada Christian Hospital