शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना जिल्ह्यात चालना देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता जिल्हा रुग्णालयासह शहादा, तळोदा व नवापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रकल्प कार्यान्वित आहेत, तर काही ...

जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी लक्षात घेता जिल्हा रुग्णालयासह शहादा, तळोदा व नवापूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये प्रकल्प कार्यान्वित आहेत, तर काही ठिकाणी सुरू होत आहेत. आता खासगी उद्योजकांनादेखील असे प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने प्रोत्साहन देण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यातील पात्र उद्योजकांनी ३० जूनपूर्वी अर्ज सादर करावेत, असे आवाहन महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, नंदुरबार यांनी केले आहे.

‘मिशन ऑक्सिजन स्वावलंबन’ योजनेअंतर्गत धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील पात्र ऑक्सिजन निर्मिती उद्योगांना गुंतवणुकीच्या कमाल १५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या अनुदानामध्ये राज्य वस्तू व सेवा कराचा १०० टक्के परतावा, पाच टक्के व्याज अनुदान, पहिल्या पाच वर्षांसाठी दोन रुपये प्रतियुनिट वीज अनुदान, विद्युत शुल्क माफी व मुद्रांक शुल्क माफी या अनुदानांचा समावेश आहे.

२५ मेट्रिक टनपेक्षा जास्त उत्पादन क्षमतेच्या उद्योगांना स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या २० टक्के किंवा कमाल १५ कोटी रुपये एवढे भांडवली अनुदान समान पाच हप्त्यांमध्ये दिले जाणार आहे. तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या क्षेत्रामध्ये स्थापित होणाऱ्या घटकांना प्राधान्याने भूखंड वाटप करतांना प्रचलित दरामध्ये ५० टक्के सूट देण्यात येईल.

एमएसएमई प्रवर्गातील ५० कोटी रुपयांपर्यंत स्थिर भांडवली गुंतवणूक असलेले प्रकल्प ३१ मार्चपर्यंत उत्पादनात जाणे आवश्यक आहे. भांडवली अनुदानाचा लाभ मिळविण्यासाठी २५ मेट्रिक टनवरील उद्योगांनी ३१ डिसेंबरपूर्वी व ५० मेट्रिक टनवरील उद्योगांनी ३० जूनपर्यंत उत्पादनात जाणे आवश्यक राहील. योजनेच्या अधिक माहितीसाठी जिल्हा उद्योग केंद्र येथे संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.