शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांचे ऑक्सिजन व फायर ऑडिट होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

नंदुरबार : नाशिक, विरार येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी तातडीने ऑक्सिजन, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी समितीचे गठण केले ...

नंदुरबार : नाशिक, विरार येथील घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी तातडीने ऑक्सिजन, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी समितीचे गठण केले आहे. ही समिती सर्व शासकीय व खासगी कोरोना रुग्णांचे तातडीने ऑडिट करून तसा अहवाल प्रशासनाला सादर करणार आहे.

जिल्ह्यात शासकीय व खासगी कोरोना रुग्णालयांची संख्या वाढली आहे. अनेक रुग्णालयांमध्ये आवश्यक सुविधा नसतानाही त्या ठिकाणी कोविड कक्ष सुरू करण्यात आले आहेत. अशा ठिकाणी रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली आहे. त्यामुळे या रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट करणे गरजेचे झाले आहे. नाशिक, विरारसारखी दुर्दैवी घटना घडू नये यासाठी आता जिल्हा प्रशासनही सतर्क झाले असून, त्यादृष्टीने पहिले पाऊल म्हणून शासकीय ऑडिट समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत सर्व शासकीय व खासगी कोविड रुग्णालयांचे ऑडिट केले जाणार आहे.

याबाबत काढण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्ह्यात शासकीय व खासगी कोरोना रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. अशा रुग्णालयांचे ऑक्सिजन, फायर व स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिनस्त शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालये, शासकीय तंत्रनिकेतन, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य यांची समिती नेमण्यात येत आहे.

जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयात ऑक्सिजन प्रणाली कार्यान्वित असून, ऑक्सिजन नलिकांद्वारे रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येतो. त्यामुळे ऑक्सिजन हा रुग्णांचा जीवनाचा महत्त्वाचा घटक असून त्याचा योग्य प्रकारे वापर होणे आवश्यक आहे. त्याचेच ऑडिट ही समिती करेल.

असे असेल जिल्हास्तरीय रुग्णालयांचे ऑडिट...

n समितीने तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देऊन या मनुष्यबळाद्वारे जिल्ह्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमधील ऑक्सिजन वायुनलिकांची तसेच संपूर्ण ऑक्सिजन प्रणालीचा कालबद्ध कार्यक्रम आखून तपासणी करून घ्यावी व ऑडिट पूर्ण करून घ्यावे.

n तपासणीच्या वेळी वायुनलिकांमध्ये गळती असल्यास अथवा पुनर्बांधणी करणे आवश्यक असल्यास याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करावा. अहवाल विचारात घेऊन शासकीय रुग्णालयात आवश्यक त्या दुरुस्ती करण्यासाठी यथाशीघ्र कार्यवाही करावी.

n खासगी रुग्णालयांबाबत संबंधित रुग्णालयास तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन आवश्यक कार्यवाही होईल याची दक्षता घ्यावी.

n समिती सदस्यांनी ऑक्सिजन ऑडिट, फायर ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटींची पूर्तता संबंधित रुग्णालयाच्या प्रमुखांकडून तत्काळ पूर्ण करून घ्याव्यात.

n सर्व शासकीय व खासगी कोरोना हॅास्पिटलप्रमुखांकडून ऑक्सिजन ऑडिट, स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटीची पूर्तता झाल्याबाबत अहवाल प्राप्त करून त्यांना त्रुटीपूर्तता अहवाल समिती सदस्यांनी सादर करावा.

n समिती सदस्यांनी आवश्यक ते तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे तसेच त्या अनुषंगाने साहाय्य व समन्वयन तहसीलदार व त्यांच्या अधिनस्त अधिकारी करतील.