शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटावर मात करीत बळीराजा नव्या उमेदीने सरसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहादा व परिसरात अद्याप पपई फळांची तोडणी झाली नसताना खचून ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर शहादा व परिसरात अद्याप पपई फळांची तोडणी झाली नसताना खचून न जाता पुढील हंगामासाठी रणरणत्या उन्हात पपईची लागवड करण्यासाठी बळीराजा पुढे आला आहे. परिस्थिती कशीही असो आपण आपले काम नित्यनियमाने करीत ‘थांबला तो संपला’ असा संदेश बळीराजा आपल्या कर्तृत्वातून देत आहे.खान्देशात पपईचे सर्वाधिक उत्पादन शहादा तालुक्यात घेतले जाते. येथे उत्पादीत झालेली पपई उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात विक्री होते. त्याचप्रमाणे पपईच्या उत्पादनातून हमखास उत्पादन मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल पपई लागवडीकडे वाढला आहे. दरवर्षी पपईच्या दरामुळे पपई उत्पादक शेतकरी व खरेदीदार व्यापारी यांच्यात संघर्ष होतो. मात्र संपूर्ण लागवड झालेली पपई विक्री होते. यंदा कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे देशात केंद्र शासनाने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केल्याने माल वाहतूक सेवा बंद आहे. पपईचे पीक शेतात तयार आहे मात्र वाहतूक बंदीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. अशा परिस्थितीत काही प्रमाणात वाहतूक सेवा सुरळीत झाल्याने पपईची तोडणी सुरू आहे. मात्र कमी दरामुळे शेतकरी नाराज आहेत. यामुळे पुढील हंगामात परिसरात पपईची लागवड होते किंवा नाही अशी शंका अनेक व्यापाºयांसह शेतकºयांनी व्यक्त केली होती.साधारणत: एप्रिल महिन्यात पपई रोपांची लागवड केली जाते. पाण्याची व्यवस्था म्हणून ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्याकडे शेतकºयांचा कल वाढला आहे. यासह एप्रिल-मे महिन्यात तापमानात कमालीची वाढ होते व अक्षयतृतीयेनंतर वाºयाचा वेगही वाढलेला असतो. वाढत्या तापमानापासून तसेच वाºयापासून रोपांना वाचविण्यासाठी पपई रोपांची लावणी केल्यानंतर त्याच्या संरक्षणासाठी विशेष प्लास्टिकचा वापर करून रोपांचे संरक्षण केले जाते. त्यानंतर फळधारणापर्यंत कुठल्याही रोगाची लागण होऊ नये यासाठी कीटकनाशकांचा वापर करण्यासह औषध फवारणी करून देखभाल केली जाते. एकंदरीत रोप विकत घेण्यापासून त्याची लागवड झाल्यानंतर वर्षभर देखभाल करून त्यानंतर परप्रांतीय व्यापाºयांकडून त्याची होणारी खरेदी हा संपूर्ण वर्षभराचा प्रवास सुरू असताना दराबद्दल व्यापाºयांकडून शेतकºयांची होणारी पिळवणूक या साºया संघर्षात पुढील हंगामासाठी परिसरातील बळीराजा सज्ज झाला आहे.