शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन बियाण्याची तपासणी करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सात भरारी पथके ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात बोगस बियाणे आणि भेसळयुक्त खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यासाठी सात भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत़ या पथकांनी रविवारी उशिरापर्यंत पाच ठिकाणी कारवाई केली़ यात विसरवाडी ता़ नवापूर येथे एका कंपनीचे खत भेसळयुक्त असल्याचे समोर आल्याने संबधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे़राज्यात खरीप हंगामात गुणवत्ता असलेले खत आणि बियाणे यांची विक्री व्हावी यासाठी कृषी विभागाने प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर भरारी पथक नियुक्त केले आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात सहा तालुका व एक जिल्हास्तरीय पथक नियुक्त करण्यात आले आहे़ या पथकांनी रविवारी अक्कलकुवा तालुक्यात वाण्याविहिर, नवापूर तालुक्यात खांडबारा, शहादा व नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे तपासणी केली होती़ या दरम्यान या पाच ठिकाणी बियाणे आणि खते यांची गुणवत्ता ढासळली असल्याचे दिसून आल्याने तसेच कृषी सेवा केंद्रांचे व्यवहार बंद असल्याने कारवाई करण्यात आली़ या प्रकाराने कृषी सेवा केंद्रांच्या चालक आणि मालकांत खळबळ उडाली असून त्यांनी कंपन्यांकडून आलेल्या मालाची तपासणी करणे सुरू केले आहे़ दरम्यान सोमवारी कृषी विभागाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नरेंद्र पाडवी यांनी गोदामे व दुकानांची तपासणी केली आहे़ तालुका आणि जिल्हास्तरावर ही तपासणी होत आहे़सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेबाबत राज्याच्या विविध भागात तक्रारी होत आहेत़ नंदुरबार जिल्ह्यात ही स्थिती उद्भवू नये यासाठी कृषी विभागाने बियाणे नमुने तपासणीसाठी देण्याचे आदेश दिले असून बियाण्यात दोष असल्यास शेतकऱ्यांना ते बदलून देण्याचे आदेश सर्व दुकानदार आणि गोदामे यांना प्रशासनाकडून देण्यात आले आहेत़अक्कलकुवा तालुकास्तरीय भरारी पथकाने वाण्याविहिर ता़ अक्कलकुवा येथील महावीर व नागेश फर्टिलायझर या दुकानांमध्ये तपासणी केली असता, अनियमितता आढळल्याने खत नियंत्रण कायदा १९८५ अन्वये खतव्रिकी बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी गढरी यांनी बजावले यावेळी तालुका गुणनियंत्रण अधिकारी बोराळे उपस्थित होते़खांडबारा ता़ नवापूर येथील कुबेर कृषी सेवा केंद्र, शांताई कृषी सेवा केंद्र येथेही खत विक्री बंद करण्याचे आदेश तालुका कृषी अधिकारी व्ही़डी़चौधरी यांनी रविवारी काढले आहेत़खत विक्री बंद करण्याचे आदेश देण्यात आलेल्या विक्रेत्यांची कागदपत्रांची तपासणी विभागाकडून केली जात आहे़जिल्हास्तरीय पथकाने शहादा येथे विजय ट्रेडर्स या दुकानावर रविवारी तपासणी केली होती़ यावेळी याठिकाणी व्यवहार बंद असल्याचे दिसून आल्यानंतर खत व बियाणे विक्री थांबवण्याचे आदेश पथकाकडून सांगण्यात आले़ शहादा शहरातीलच सातपुडा कृषी सेवा केंद्रात बियाणे विक्री बाबत अनियमितता आढळून आल्याने येथून पाच कंपन्यांच्या बियाणे विक्रीला बंदी करण्यात आली आहे़जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या कंपन्यांची यादी तयार करुन त्यानुसार विभाग कारवाई करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांची जनजागृती केली जात आहे़सोयाबीन बियाणे बाबत राज्य शासनाचे आदेश आहेत़ त्यानुसार तपासणी करुन घेत आहेत़ सर्व सहा पथके जिल्हास्तरावर कार्यरत आहेत़ संपूर्ण खरीप हंगामात दुकानांची तपासणी सुरु राहणार आहे़ बोगस बियाणे व खत आढळल्यास तात्काळ कारवाई होणार आहे़-नरेंद्र महाले, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी विभाग, नंदुरबाऱ