जामिया शैक्षणिक संकुलात ऑनलाईन शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:31 IST2021-04-24T04:31:01+5:302021-04-24T04:31:01+5:30

कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. प्रसंगी बार कॉन्सलिंगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख, न्यायमूर्ती ए.डी करभजन, जळगाव येथील ...

Online camp at Jamia Educational Complex | जामिया शैक्षणिक संकुलात ऑनलाईन शिबिर

जामिया शैक्षणिक संकुलात ऑनलाईन शिबिर

कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठणाने करण्यात आली. प्रसंगी बार कॉन्सलिंगचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲड. सतीश देशमुख, न्यायमूर्ती ए.डी करभजन, जळगाव येथील मणियार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी वाय. रेड्डी, नंदुरबार विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सतीश चौधरी, प्रा. डॉ.विजीता सिंग, डॉ. एम.आय.बेग उपस्थित होते. जामिया संस्थेचे अध्यक्ष मौलाना गुलाम मोहम्मद वस्तानवी, मुख्य कार्यकारी अधिकारी मौलाना हुजैफा वस्तानवी, प्रभारी प्राचार्य जामिया विधि महाविद्यालय डॉ. जरताब जमीन अंसारी, मैनेजमेंट प्रतिनिधि अखलाख शेख यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी जिल्हाधिकारी डाॅ. भारुड यांनी विविध धार्मिक ग्रंथांच्ये श्लोक द्वारे शिक्षणाचे व मानवतेचे महत्व पटवुन दिले. अक्कलकुवा येथे विधि कॉलेज सुरु झाल्याने गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांची सोय झाल्याचे त्यांनी सांगितले.

यशस्वीतेसाठी अखलाख शेख, प्राध्यापक इम्तियाज सैय्यद, प्राध्यापक सोहेल पटेल, प्राध्यापक आसिफ, प्राध्यापक अड़. प्रवीण ठाकरे यांनी परिश्रम केले.

Web Title: Online camp at Jamia Educational Complex