लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शिक्षकांशी वाद घालू नका याबाबत बोलल्याचा राग येवून एकास दगडाने मारून जखमी केल्याची घटना मालपाडाचा सरपंचपाडा, ता.अक्कलकुवा येथे घडली.मालपाडा येथील रायसिंग अमरसिंग वळवी यांनी शिक्षकाशी वाद घालू नका म्हणून सांगितले. त्याचा राग येवून दमण्या चांद्या वळवी यांनी दगड मारून रायसिंग वळवी यांचे डोके फोडले.याबाबत रायसिंग वळवी यांनी फिर्याद दिल्याने दमण्या वळवी यांच्याविरुद्ध मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार पाडवी करीत आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}