शहरं
Join us  
Trending Stories
1
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
2
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
3
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
4
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
5
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
6
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
7
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
8
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
9
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
10
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
11
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
12
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
13
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
14
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
15
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
16
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
17
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 
18
Pitru Paksha 2025: तिथीनुसार पितरांचे श्राद्ध करा, 'हे' लाभ मिळवा आणि तिथीच माहीत नसेल; तर... 
19
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
20
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

प्राधान्य कुटुंब योजनेत एक हजार कुटुंब वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शासनाच्या प्राधान्य कुटुंब योजनेत स्वस्त धान्य मिळण्यासाठी तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील साधारण दीड हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शासनाच्या प्राधान्य कुटुंब योजनेत स्वस्त धान्य मिळण्यासाठी तळोदा तालुक्यातील ग्रामीण भागातील साधारण दीड हजार शिधापत्रिका धारकांनी येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडे प्रकरणे दाखल केली आहे. परंतु ग्रामीण भागातून केवळ 370 कुटुंबांना लाभ देण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असल्याने साहजिकच उर्वरित कुटुंबांना धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने वंचित कार्डधारकांची मोठी संख्या लक्षात घेऊन तालुक्यासाठी उद्दिष्टय़ वाढवून देण्याची अपेक्षा शिधापत्रिकाधारक कुटुबांनी केली आहे.गेल्या चार वर्षापासून केशरी रंगाच्या शिधापत्रिकाधारकांचे रेशन दुकानदात मिळणारे धान्य शासनाने बंद केले होते. अर्थात सधन कुटुंबेही शासनाच्या रेशनचा फायदा घेत असल्यामुळे शासनाने हे धान्य बंद केल्याचे म्हटले जात होते. परंतु शासनाच्या या धोरणामुळे खरोखर गरीब असलेली कुटुंबेदेखील वंचित राहत होते. त्यामुळे शासनाने दोन वर्षापासून अशा केशरी शिधापत्रिकांना स्वस्त धान्य मिळावे यासाठी प्राधान्य कुटुंब योजना सुरू केली आहे. तळोदा शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातील स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत अशा केशरीकार्डधारक कुटुंबाकडून हमीपत्रे भरून घेण्यात आली आहेत. शहरी भागासाठी कुटुंबाचे उत्पन्न 65 हजार तर ग्रामीण भागातील कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 42 हजार अशी उत्पन्नाची मर्यादा शासनाने निर्धारित केली आहे. येथील तहसील कार्यालयाच्या पुरवठा शाखेकडे ग्रामीण भागातून साधारण एक हजार 540 हमीपत्रे दाखल करण्यात आली आहेत. जिल्हा पुरवठा अधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली पुरवठा शाखेने हमी पत्रांची नियमानुसार कार्यवाहीदेखील सुरू केली आहे. तथापि पुरवठा विभागाने या योजनेसाठी ग्रामीण भागास केवळ 370 कुटुंबांनाच समाविष्ट करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. त्यामुळे दाखल केलेल्या हमीपत्रांपैकी 75 टक्के कुटुंबांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. वास्तविक शहर व ग्रामीण भाग मिळून साधारण साडेपाच हजार कुटुंबे केशरी शिधा पत्रिकाधारक आहेत. त्यापैकी तीन हजार शिधापत्रिकाधारक ग्रामीण भागात आहेत. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात शिधापत्रिकाधारकांची संख्या असतांना ग्रामीण भागास एवढय़ा  कमी उद्दिष्ट दिल्याने संबधीत यंत्रणेच्या नियोजनाबाबत ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शासनाच्या उत्पन्नाची मर्यादा व इतर कागदपत्रांच्या निकषानुसारच शिधापत्रिकाधारकांनी हमीपत्र दुकानदाराकडे दाखल केल्याचे लाभार्थ्ीचे म्हणणे आहे. त्यामुळे ज्या योजनेत समावेश होणार नाही, असे लाभार्थी व दुकानदारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद उद्भ्वण्याची शक्यतादेखील नाकारता येणार नाही. त्यामुळे संबंधीत यंत्रणेने               याप्रकरणी दखल घेऊन निदान दिलेल्या उद्दिष्टय़ात वाढ करून              द्यावी, अशी मागणी केशरी कार्ड धारकांनी केली आहे. तळोदा शहरात केशरी शिधापत्रिकांची संख्या साधारण दोन हजार 474 असतांना संबंधीत पुरवठा शाखेकडे निम्या संख्येनेदेखील हमीपत्रे दाखल झालेले नाही. केवळ एक हजार हमी पत्रे दाखल झाल्याचे पुरवठा विभागाने दिलेल्या आकडेवारीतून दिसून येते. वास्तविक ग्रामीण भागापेक्षा पुरवठा विभागाने प्राधान्य धान्य योजनेत तळोदा शहराला अधिक उद्दिष्ट दिले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार साधारण साडेतीन हजार कुटुंबांना समावेश करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. या कार्डधारकांची एकूण संख्या लक्षात घेता शहरात अडीच हजारच शिधापत्रिकाधारक आहेत. त्यामुळे या यंत्रणेच्या भोंगळ कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तळोदा शहरात प्राधान्य कुटुंब योजनेबाबत पुरेशी माहिती मिळाली नसल्याने कार्डधारकांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे सांगितले जात आहे. तळोदा शहराला दिलेले उद्दिष्ट पूर्ण होत नसले तर हे उद्दिष्ट ग्रामीण भागात वाढवून द्यावे, अशी अपेक्षा शिधापत्रिका धारकांनी व्यक्त केली आहे.