लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील पीर तलाव परिसरात चौघांनी एकास दमदाटी करुन रोख रक्कम लंपास केल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली़ चौघांनी रस्त्यावरुन ये-जा करतो म्हणून हप्ता दे अशी मागणी करत शिवीगाळ केली होती़ घोडापीर मोहल्ल्यातील शेख इमरान शेख सलीम कुरेशी हे खामगाव येथून पोल्ट्रीचे पैसे घेऊन रात्री घरी येत असताना पीर तलावाजवळ भिमा लाकूड तोडय़ा रा़ बंधारहट्टी व इतर तिघांनी वाहन अडवल़े यावेळी चौघांनी दमदाटी करुन इमरान कुरेशी यांच्या खिशातील 14 हजार काढून घेत वाहनाची तोडफोड करुन नुकसान केल़े कुरेशी यांनी तातडीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेत दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}