शहादा महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय ई-चर्चासत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:58 IST2021-02-18T04:58:35+5:302021-02-18T04:58:35+5:30

प्रथम सत्रात गुजरात आणंद येथील हिंदी कवी डॉ. खन्ना प्रसाद अमीन यांनी हिंदी आदिवासी साहित्य की अवधारणा या विषयावर ...

One day national e-discussion session at Shahada College | शहादा महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय ई-चर्चासत्र

शहादा महाविद्यालयात एक दिवसीय राष्ट्रीय ई-चर्चासत्र

प्रथम सत्रात गुजरात आणंद येथील हिंदी कवी डॉ. खन्ना प्रसाद अमीन यांनी हिंदी आदिवासी साहित्य की अवधारणा या विषयावर सखोल माहिती दिली. प्रथम सत्राचा समारोप अध्यक्ष प्रा.डॉ. सुनील पानपाटील यांनी केला. द्वितीय सत्रात बिहार केंद्रीय विश्वविद्यालय गया येथील प्रा.अनुज लुगुन यांनी हिंदी आदिवासी साहित्य का सौंदर्यशास्त्र या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच इंदिरा कला संगीत विद्यापीठ छत्तीसगडचे प्रा.देवमाईत मिंज यांनीही मार्गदर्शन केले. तृतीय सत्रात प्रमुख वक्ते म्हणून रांची येथील ज्येष्ठ आदिवासी साहित्यिक महादेव टोप्पो यांनी आदिवासी साहित्य की प्रेरणाएं या विषयावर माहिती दिली. तर मराठवाडा विद्यापीठाचे प्रा.डॉ. भगवान गवाडे यांनी समारोप केला.

या कार्यक्रमास धुळे येथील विद्यावर्धिनी महाविद्यालयाच्या प्रा.डॉ. जयश्री गावीत उपस्थित होत्या. सूत्रसंचालन डॉ.विजयप्रकाश शर्मा तर आभार डॉ.गौतम कुवर यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रा.गोपाल गवई, प्रा.एस.एस. पवार यांनी परिश्रम घेतले. या चर्चासत्राचे संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, मानद सचिव कमलताई पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, समन्वयक प्राचार्य मकरंद पाटील, पी.आर. पाटील, उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल, डॉ.एस.डी. सिंदखेडकर यांनी कौतुक केले.

Web Title: One day national e-discussion session at Shahada College