शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

फळ बागांसाठी एक कोटींचे अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील १०० शेतकऱ्यांच्या १०२ हेक्टरसाठी फळ बागाचे साधारण एक कोटी पेक्षा अधिक अनुदान मंजूर ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील १०० शेतकऱ्यांच्या १०२ हेक्टरसाठी फळ बागाचे साधारण एक कोटी पेक्षा अधिक अनुदान मंजूर करण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने तालुक्यात बागायती क्षेत्र अधिक असल्याने फळ बागाचे क्षेत्र २५० हेक्टरपर्यंत वाढविण्याच्या सूचना येथील कृषी विभागाला दिल्या आहेत.शेतकऱ्यांनी केवळ पारंपरिक शेती न करता फळबाग शेतीदेखील कसावी यासाठी शासनाने फळबाग शेतीला अधिक प्रोत्साहन दिले आहे. कारण या शेतीसाठी प्रति हेक्टरी एक लाख ६७ हजार रूपये दिले जात असते. तळोदा तालुक्यातील शेतकरी ही गेल्या चार ते पाच वर्षापासून फळबाग शेतीकडे वळले आहेत. गेल्या वर्षी साधारण ९० शेतकºयांनी शासनाकडून फळबाग शेतीचे अनुदान घेतले होते.यंदाही इच्छागव्हाण, टाकळी, रामपूर, सतोना, माळखुर्द या आदिवासी भागातील १०२ शेतकºयांनी तालुका कृषी कार्यालयाकडे आंबा व लिंबू या फळांच्या फळबागांचे १०२ हेक्टरचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यांचा या प्रस्तावानवर कृषी कार्यालयाने तातडीने कार्यवाही करून संबंधीत यंत्रणेकडे अनुदानाची मागणी केली होती. जवळपास दोन कोटींची मागणी केली होती. त्यानुसार प्रशासनाने शेतकºयांचे फळबागांचे प्रस्ताव मंजूर करून त्यांना पहिल्या टप्प्यात एक कोटी रूपयांपेक्षा अधिक अनुदान मंजूर केल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. प्रति हेक्टरी दिले जाणारे अनुदान हे शेतकºयांना तीन वर्षात तीन टप्प्यात दिले जात असते.प्रशासनाने फळ बागांचे अनुदान तातडीने मंजूर करून उपलब्ध केल्यामुळे शेतकºयांनी समाधान व्यक्त केले असून, आता कृषी कार्यालयाने तत्काळ पुढील कार्यवाही करून शेतकºयांना वाटप करावे, अशी अपेक्षा आहे. दरम्यान तळोदा तालुक्यात बागायती क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे आणखीन २०० ते २५० हेक्टर पेक्षा अधिक फळ बागांचे क्षेत्र वाढविण्याच्या सूचनादेखील जिल्हा प्रशासनाने कृषी कार्यालयाला दिल्या आहेत.तळोदा तालुक्यात दुर्गम भागात अनेक गावे आहेत. त्याचबरोबर अशा शेतकºयांची संख्याही मोठी आहे. कृषी विभागाने या शेतकºयांमध्ये फळ बाग शेती व त्यासाठी शासनाचे असणारे अनुदान याबाबत जनजागृती, प्रबोधन केले तर निश्चितच हे शेतकरी फळबाग शेतीसाठी स्वत:हून पुढे येतील. मात्र त्यासाठी कृषी विभागाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवला पाहिजे. त्याचबरोबर शासनाच्या अनुदानाबाबतही लवकर कार्यवाही केली पाहिजे.ठिबक सिंचन योजनेच्या अनुदानासाठी तळोदा तालुक्यातील ३१९ शेतकºयांनी गेल्या वर्षी येथील कृषी कार्यालयाकडे प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील १६१ शेतकºयांचे प्रस्ताव मंजूर होऊन त्यांचा अनुदानाचा मार्ग मोकळा झाला आहे. तथापि अद्याप १५८ शेतकºयांना अनुदानाची प्रतिक्षा लागून आहे. वास्तविक शेतकरी उधार उसनवाणी व सावकाराकडून कर्ज काढून शेतात ठिबक सिंचन करीत असतो. साहजिकच संबंधीत पैसे देणारे त्याच्या मागे पैशांचा तगादा लावत असतात. इकडे ठिबकच्या अनुदानासाठी त्यांना सारखे कार्यालयात थेटे घालावे लागत असते. एकीकडे शासन भूगर्भातील पाण्याची बचत करण्यासाठी शेतकºयांमध्ये ठिबक योजनाद्वारे प्रोत्साहन देते तर दुसरीकडे त्याचे अनुदान देण्यात काटकसरचे धोरण अवलंबते. शासनाच्या या दिरंगाईच्या धोरणाबाबत शेतकºयांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. शेतकºयांची झालेली बिकट आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ये शिल्लक शेतकरी राहिले आहेत त्यांच्या अनुदानाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी शेतकºयांची मागणी आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकºयांनी दिला आहे.