शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटी 42 लाख वसुली 232 प्रकरणे निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 11:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करून एकुण एक कोटी 42 लाख 28 हजार 36 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय लोकअदालतीत 232 प्रकरणांचा निपटारा करून एकुण एक कोटी 42 लाख 28 हजार 36 रुपयांची वसुली करण्यात आली. येथील जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा सत्र न्यायाधिश प्रमोद तरारे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्या. एस. टी.मलिये, न्या.एल.डी.गायकवाड, न्या.जी.एच.पाटील, न्या.व्ही.जी.चव्हाण, एस.ए.विराणी, एन.बी.पाटील यांच्यासह पॅनेल प्रमुख चिंतामनी आर.सोनार, पी.एन.इंद्रजीत, डी.एस.पाटील, अॅड.सीमा खत्री, शारदा पवार, यु.एच.केदार, एस.ए.सोनार, व्ही.बी.शहा, एच.एम.गांगुर्डे आदी उपस्थित होते.लोकअदालतीत प्रलंबीत व दाखलपूर्व प्रकरणी सुनावणीसाठी होती. प्रलंबीत प्रकरणांमध्ये दिवाणी केसेस 55 निकाली काढण्यात आले. त्यातून सहा लाख 23 हजार 878 रुपयांची रक्कम वसुल करण्याचे आदेश देण्यात आले.  मोटार अपघाताची 13 प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून 21 लाख तीन हजार रुपयांची वसुलीचे आदेश. धनादेश अनादराचे 37 प्रकरणे निकाली निघाली. त्यातून 29 लाख 86 हजार 828 रुपयांची वसुलीचे आदेश देण्यात आले. कौटूंबिक वादाची दहा प्रकरणे तर फौजदारी स्वरूपाची आठ प्रकरणे निकाली काढण्यात आली. एकुण 123 प्रकरणे निकाली काढून 57 लाख 13 हजार 706 रुपयांची वसुलीचे आदेश देण्यात आले.दाखलपूर्व प्रकरणांमध्ये बँक वसुलीची 79 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यातून 84 लाख 67 हजार 317 रक्कमेची वसुलीचे आदेश देण्यात आले. वीज थकबाकी वसुलीची आठ प्रकरणे निकाली निघाली. त्यातून 22 हजार 510 तर बीएसएनएल व इतर फायनान्सची 22 प्रकरणे निकाली काढली गेली. त्यातून 85 लाख 14 हजार 330 रुपयांच्या वसुलीचे आदेश देण्यात आले.सर्व मिळून एकुण 232 प्रकरणे निकाली काढण्यात येवून एक कोटी 42 लाख 28 हजार 36 रुपयांच्या रक्कमेची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले.     

राष्ट्रीय लोकअदालतीत मोठय़ा प्रमाणावर दावे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे जिल्हाभरातून पक्षकार उपस्थित होते. सामोपचाराने आणि तडजोडीतून प्रकरणे मिटविण्यात येत होते. परिसरात गर्दी झाली होती.