शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
4
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
5
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
6
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
7
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
8
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
9
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
10
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
11
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
12
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
13
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
14
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
15
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
16
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
17
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
18
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
19
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
20
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या वादातून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शेती खेडण्याच्या वादातून जमावाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना भांग्रापाणी, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शेती खेडण्याच्या वादातून जमावाने एकास बेदम मारहाण केल्याची घटना भांग्रापाणी, ता.अक्कलकुवा येथे घडली. याप्रकरणी १० जणांविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.काठी रस्त्यालगत वनसिंग बाल्या वसावे यांची शेती आहे. त्या ठिकाणी सामसिंग दित्या वसावे व इतर जण शेती खेडत होते. याबाबत वनसिंग वसावे यांनी त्यांना जाब विचारला असता त्यातून वाद झाला. वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. वनसिंग वसावे यास जमावाने लाकडी दांडकाने जबर मारहाण केली. तसेच शिविगाळळ करून ठार मारण्याची धमकी दिली. जबर जखमी झालेल्या वनसिंग वसावे यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे उपचार घेतांना त्यांनी लेख फिर्याद दिली.याबाबतत वनसिंग यांनी फिर्याद दिल्याने सामसिंग दित्या वसावे, आबला दित्या वसावे, दिपला वसावे, निंबा दित्या वसावे, दिलीप उग्राण्या वसावे, सायसिंग उग्राण्या वसावे, बहादुरसिंग सूरज्या वसावे, गुलाबसिंग आबला वसावे, नितीन सामसिंग वसावे, प्रमोद मोतिसिंग वसावे सर्व राहणार भांग्रापाणीचा पाटीलपाडा, ता.अक्कलकुवा यांच्याविरुद्ध मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास मोलगी पोलीस करीत आहेत. अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले.