शहरं
Join us  
Trending Stories
1
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
2
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
3
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
4
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
5
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
6
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
7
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
8
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
9
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
10
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
11
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
12
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
13
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
14
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
15
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
16
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
17
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
18
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
19
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
20
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य ग्रामसभांबाबत उदासिनता

By admin | Updated: April 23, 2017 17:41 IST

नंदुरबार जिल्ह्यात 2014 पासून आरोग्य ग्रामसभा एकाही गावात झालेली नाही़

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 23 - ग्रामस्थ व आरोग्य विभाग यांच्यामध्ये थेट संपर्क व्हावा यासाठी 2014 पासून आरोग्य मंत्रालयाने गावांमध्ये 24 एप्रिल ते 1 मे या दरम्यान आरोग्य ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले होत़े शासनाने काढलेले हे आदेश कागदोपत्रीच ठरले असून नंदुरबार जिल्ह्यात 2014 पासून आरोग्य ग्रामसभा एकाही गावात झालेली नाही़
या आरोग्य ग्रामसभेमध्ये जनतेचे आरोग्यविषयक प्रश्न, आरोग्य विभागातर्फे राबवण्यात येणा:या योजना, आरोग्यविषयक कार्यक्रम, लोकांना मिळणा:या विविध सुविधा अशा विषयांवर माहिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता़ 24 एप्रिल ते 1 मे या कालावधीत ही ग्रामसभा घेण्यात येणे आवश्यक असतानाही ग्रामपंचायतींकडून त्याकडे पाठ दाखवण्यात आली आह़े विशेष म्हणजे अनेकांना 1 मे रोजी होणा:या ग्रामसभांमध्ये आरोग्यविषयक एखादा  ठराव करून आरोग्यसभा असल्याचे दर्शवण्याचा प्रयत्न केला आह़े मात्र अद्याप पूर्णपणे आरोग्य ग्रामसभा जिल्ह्यात झालेली नाही़

नंदुरबार जिल्ह्यात 952 गावे आणि 586 ग्रामपंचायती आहेत़ यात नंदुरबार तालुक्यात 137, शहादा 150, तळोदा 67, नवापूर 114, अक्कलकुवा 66 तर धडगाव तालुक्यात 52 ग्रामपंचायती आहेत़ या एकूण 586 ग्रामपंचायतींच्या पदाधिका:यांना आरोग्य विभागाने 2014 च्या अखेरीस ग्रामसभेमध्ये आरोग्य विषयक जनजागृती होण्यासाठी आरोग्यबाबतचे विषय  घेण्याबाबतच्या कठोर सूचना करून आरोग्य ग्रामसभा भरवण्याचे आदेश दिले होत़े शासनाच्या आरोग्य विभागाने 26 जून 2014 मध्ये पारित केलेल्या आदेशांच्या प्रती आरोग्य विभागाच्या मार्फत जिल्हा परिषद आणि तेथून ग्रामपंचायतींना वितरण करण्यात आले होत़े मात्र असे असूनही गेल्या दोन वर्षा एकाही ग्रामपंचायतीने आरोग्य ग्रामसभा घेतलेल्या नसल्याचे त्यांनी ग्रामविकास विभागाकडे केलेल्या ठरावांद्वारे दिसून आले आह़े विशेष म्हणजे ही ग्रामसभा 24 एप्रिल ते 1 मे या काळात घेतली गेलेली नाही़
पंचायत राज ते महाराष्ट्र दिन असा या सात दिवसांचा कालावधी असल्याने येत्या आठवडाभरात तरी जिल्ह्यातील गावांमध्ये आरोग्य ग्रामसभा होतील का, याकडे लक्ष लागून आह़े बहुतांश गावांच्या ग्रामसभांची कार्यक्रम पत्रिका तयार असली, तरी त्यात आरोग्य विषय नाही़
 जिल्ह्यात आरोग्य ग्रामसभा ह्या शासनाने दिलेल्या काळात व्हाव्यात म्हणून प्रयत्न केला आह़े परंतू जिल्ह्यातील गावांमध्ये या प्रकारच्या सभा झालेल्या नाहीत़ आरोग्य ही महत्त्वपूर्ण बाब असूनही दुर्लक्ष होत आह़े आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्याव़े
-निशा तांबे, सामाजिक कार्यकत्र्या़