शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
3
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
4
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
5
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
6
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
7
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
8
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
9
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
10
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
11
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
12
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
13
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
14
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
15
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
16
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
17
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
18
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
19
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
Daily Top 2Weekly Top 5

आता कोरोनाची जनजागृती होणार आदिवासी बोलीभाषेतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2020 10:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषदेत लोकसमन्वय प्रतिष्ठान व लोकसंघर्ष ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे प्रबोधन करण्यासाठी जिल्हा परिषदेत लोकसमन्वय प्रतिष्ठान व लोकसंघर्ष मोर्चातर्फे तयार करण्यात आलेल्या भिली व पावरी भाषेतील पोस्टर्सचे प्रकाशन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते करण्यात आले़यावेळी लोकसमन्वयचे संजय महाजन, निशांत मगरे, महेंद्र पाटील उपस्थित होते़ कोरोनाच्या वाढत्या संकटामुळे देशभरात लॉकडाऊनचे पालन सुरु आहे़ कोरोनाचा मुकाबला करताना सर्व व्यवहार ठप्प झाल्याने सर्वसामान्य जनतेचे दैनदिन जीवनही विस्कळीत झाले आहे़ त्यामुळे तोंडावर आलेला शेती हंगाम, जंगलातील वनउपज गोळा करण्याचा हंगाम बंद पडला आहे़ हाताला काहीच काम नसल्याने रोजगार हमीची कामे सुरु करण्यात येणार आहेत़ यासाठी सातपड्याच्या गावपाड्यातील आदिवासी बांधव बाहेर पडणार आहेत़ त्यांना कोरोनाचा संसर्ग होवू नये यासाठी त्यांना शासनाने जाहीर केलेले नियम व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे़ हे लक्षात घेवून लोकसमन्वय प्रतिष्ठान व लोकसंघर्ष मोर्चातर्फे आदिवासी क्षेत्रात व बोली भाषेतून प्रबोधन करण्यासाठी चार पोस्टर्स तयार करुन त्याचा सेट प्रत्येक गावात लावण्यात येणार आहे़ यातून स्थानिक बोलीभाषेचा वापर करुन सूचना करण्यात आल्या आहेत़यात कोरोना आजार, लक्षणे, घ्यावयाची काळजी, मास्क वापरतांना घ्यावयाची काळजी कामावर जाताना कायम नियम पाळावेत या विषयी सोप्या व छोट्या वाक्यांमध्ये चित्रांसह पावरी तसेच भिली/भिलोरी भाषेत माहिती दिली आहे़ सामुहिक वन व्यवस्थापनाची कामे सुरु असलेल्या गावांमध्ये व संस्थेच्या आणि संघटनेच्या धडगांव, तळोदा व अक्कलकुवा तालुक्यातील कार्यक्षेत्रात ७० गावांमध्ये हे पोस्टर्स सार्वजनिक ठिकाणी तसेच सरकारी कार्यालयांमध्ये लावले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे़