शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

पपई पिकाच्या रक्षणासाठी शेतकऱ्यांच्या ना ना क्लृप्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 12:59 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क कोठार :  तळोदा तालुक्यातील बदलत्या हवामानाचा धसका घेत शेतकऱ्यांनी पपई पिकाचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर ...

 लोकमत न्यूज नेटवर्ककोठार :  तळोदा तालुक्यातील बदलत्या हवामानाचा धसका घेत शेतकऱ्यांनी पपई पिकाचे नुकसान टाळण्यासाठी विविध उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. सद्य:स्थितीत दिवसा काही प्रमाणात उन्हाळा तर रात्री थंडी जाणवत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत आहे.तळोदा तालुक्यातील नवागाव, चिनोदा, प्रतापपूर, रांझणी, मोड, बोरद परिसरात पपईचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु असमतोल वातावरणामुळे पपई पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.पपई लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होतो. त्यात पपई रोपे, लागवड खर्च, विविध खते, महागडी फवारणी आदी खर्च होत असतो. त्यामुळे पपईवर लागवडीपासून ते काढणीपर्यत लक्ष देणे आवश्यक असते. पपईला   उष्ण व दमट हवामान चांगले  मानवते. पपईला कडाक्याची थंडी मानवत नाही. तर ज्या भागात  भरपूर पाऊस पडतो अशा भागात पपईची लागवड यशस्वी होत नाही. जोरदार वारे तसेच कडाक्याची थंडी, दव, धुके या पिकास हानीकारक असते. म्हणून या पिकावर थंडीचा व जास्त उन्हाचा प्रादुर्भाव होऊ नये  म्हणून सद्य:स्थितीत रांझणी परिसरातील शेतकऱ्यांकडून क्राँप कव्हरचा उपयोग करण्यात येत  आहे.क्राँप कव्हर हे उन्हाळा व हिवाळ्यात शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे रासायनिक फवारणी कमी लागते. शिवाय सनबर्न म्हणजे जास्त उन्हापासून फळांचे संरक्षण होते. तर यामुळे पपई पिकांच्या फळांचा रंग व आकार   +चांगला येण्यासाठी मदत होते. तसेच थंडीपासून पपईला संरक्षण मिळते व जास्त उन्हापासून होणारे नुकसान टाळता येते. त्यामुळे पपई फळांचा दर्जा टिकून ठेवत उत्पन्न चांगले येत असल्यामुळे तालुक्यातील शेत शिवारात पपई उत्पादक शेतकऱ्यांकडून  पपईसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे चित्र पहावयास मिळत    आहे.