शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

बालकांसाठी पूर्णवेळ न्यायाधीश नेमण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 12:30 IST

रमाकांत पाटील ।  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संयुक्त राष्ट्रसंघाने 1989 साली मुलांच्या हक्काच्या संहितेला मान्यता दिली. ही संहिता ...

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संयुक्त राष्ट्रसंघाने 1989 साली मुलांच्या हक्काच्या संहितेला मान्यता दिली. ही संहिता 196 देशांनी मान्य केली असून भारताने देखील ती 1992 साली मान्य केली आहे. त्यानुसार मुलांना त्यांच्या जगण्याचे अधिकार, संरक्षणाचे, विकासाच्या आणि सहभागीतेचा अधिकार  मिळवून देणे भारतासह सर्व राष्ट्र बांधील आहेत. पण दुर्दैवाने त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची खंत बालहक्क संरक्षण समितीचे राज्य सदस्य संतोष शिंदे यांनी व्यक्त केली.   बालकांसाठी कुठले कायदे आहेत, बालगुन्हेगारांसाठी न्यायालयाची अवस्था काय?बाल कायद्याअंतर्गत जवळपास 14 महत्त्वाचे कायदे असून त्यात बालविवाह प्रतिबंध, बालकांचे संरक्षण, बालमजुरी, शिक्षण, लैंगिक शोषण आणि वाहतूक यासंदर्भातील कायदे महत्त्वाचे आहेत. बालगुन्हेगारी रोखण्यासाठी प्रबोधन करणे आवश्यक आहे. जर बालकांकडून गुन्हा झाल्यास त्याच्या निपटा:यासाठी स्वतंत्र न्यायालय आहे. परंतु दुर्दैवाने या न्यायालयातील न्यायाधीशांकडे बालहक्क कायद्याच्या प्रकरणापेक्षा इतर केसेस अधिक असल्याने बालकांच्या संबंधित केसेसचा वेळीच निपटारा होत नाही. त्यामुळे बालकांच्या संदर्भातील केसेससाठी स्वतंत्र पूर्णवेळ न्यायाधीश सर्व न्यायालयांमध्ये नेमणे आवश्यक आहे.बालसंरक्षण कायद्यात काही सुधारणा आहेत का?   सन 1986 च्या बाल न्याय अधिनियमात सन 2000, 2006 आणि 2008 मध्ये महत्त्वाचे संशोधन करण्यात आले. त्यात मुलांच्या शिक्षा करण्याच्या भूमिकेत बदल करण्यात आला आहे.

मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा   2012 साली दिल्लीतील निर्भया केसनंतर दोषी मुलांना शिक्षा झालीच पाहिजे, असा सूर उमटला. कायद्याचा धाक गुन्ह्याचे कृत्य करणा:या मुलांना रहावा यासाठी 31 डिसेंबर 2015 रोजी पूर्वीच्या बाल न्याय कायदा 2000 बरखास्त करून नव्याने बाल न्याय मुलांची काळजी आणि संरक्षण कायदा 2015 संसदेने पारित केला.  या कायद्याची अंमलबजावणी देशात 2016 पासून सुरू झाली असल्याचेही संतोष शिंदे यांनी सांगितले.