नवापुरात ११ जण होम क्वारंटाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 12:36 IST2020-04-15T12:36:49+5:302020-04-15T12:36:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : सोलापुर येथे जमातचा कालावधी व्यतीत करुन ३१ मार्च रोजी नवापुर येथे परतलेल्या ११ जणांना ...

In Navapur, there are three home quarantines | नवापुरात ११ जण होम क्वारंटाईन

नवापुरात ११ जण होम क्वारंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : सोलापुर येथे जमातचा कालावधी व्यतीत करुन ३१ मार्च रोजी नवापुर येथे परतलेल्या ११ जणांना विलगीकरण कक्षातुन सोडण्यात आले. तपासणीत निगेटिव्ह अहवाल आलेले से सर्व जण पुढील १४ दिवस होम क्वॉरंटाईन राहतील.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागा यांच्याकडून शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहात पुरुषांसाठी विलगीकरण कक्ष बनविण्यात आले आहे़ तसेच महिलांसाठी शहरातील जयहिंद छात्रालयात सोय करण्यात आली आहे. ३१ मार्च रोजी सोलापूर येथून जमात मधून नवापुरात परत येण्याचा प्रयत्न करणाऱ्या ११ जणांना पथकाने ताब्यात घेतले १४ दिवसांसाठी क्वारंटाईन कक्षात दाखल केले होते़ याठिकणी त्यांची दैनंदिन चाचणी व तपासणी करण्यात येत होती. दरम्यान त्यांच्यात कोरोनाचे कोणतेही लक्षण दिसुन न आल्याने व तपासणीचे सर्व अहवाल निगेटिव्ह आल्यावर अखेर त्यांना घरी पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. १४ व्या दिवशी कक्षातून त्यांची घरी रवानगी करण्यात आली आहे़ याठिकाणी ते १४ दिवस बंदिस्त राहतील़ आरोग्य अधिकारी डॉ. एच. टी. कोकणी व डॉ. सुरेश देसाई यांनी त्यांची तपासणी केली. तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक डिगंबर शिंपी यांच्या उपस्थितीत या सर्व ११ जणांना सोडण्यात आले. सध्या नवापुरातील दोन्ही कक्षांमध्ये याठिकाणी २० पुरुष आणि १४ महिलांना ठेवण्यात आले आहे़

Web Title: In Navapur, there are three home quarantines