शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्ल्यूचा पुन्हा हॅाटस्पॅाट ठरू पहातेय नवापूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : १४ वर्षानंतर नवापूर पुन्हा बर्ड फ्ल्यूबाबत हॅाटस्पॅाट ठरू पहातेय. प्रशासनाने अहवाल येण्याचा बाकी असला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : १४ वर्षानंतर नवापूर पुन्हा बर्ड फ्ल्यूबाबत हॅाटस्पॅाट ठरू पहातेय. प्रशासनाने अहवाल येण्याचा बाकी असला तरी प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्राण्यांमधील संक्रमण व सांसारिक रोग प्रतिबंधक नियंत्रण अधिनियम २००९ अन्वये अंतर्गत प्रतिबंधक क्षेत्र घोषीत केले आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यात कुकुट पालन केंद्रांमध्ये पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने जिल्हा प्रशासनाने बर्ड फ्लू बाबत अलर्ट घोषित केला आहे. मृत पावलेल्या कोंबड्यांचे रोग निदानासाठी नमुने  औंध जिल्हा पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहे.  कुकुटपालन केंद्राच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत सतर्क क्षेत्र म्हणून नवापुर तालुक्यातील करंजी खुर्द, वाकीपाडा, विजापूर, लहान चिंचपाडा, तीन किलोमीटर अंतरावरील गावे तसेच जामतलाव, जामणी, घोडजामणे, कोठडा, काळंबा, मावची फळी, किलवनपाडा पाच किलोमीटर अंतरावरील गावे नांदवण, बेडकीपाडा, बंधारफळी, दहा किलोमीटर अंतरावरील गावे रायंगण रायपुर, बोकळझर, पायरविहिर,गडद, बिलमांजरे, बंधारपाडा, आमपाडा इत्यादी ठिकाणे सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने या क्षेत्रात  उपाययोजना करण्यासाठी प्रशासन आदेश देण्यात आले आहे. आज दिवसभरात पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी महसूल विभागाचे अधिकारी यांनी पोल्ट्रीत जाऊन तपासणी केली. सदर पोल्ट्री व्यवसायिकांना प्रतिबंधात्मक  कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत. भोपालचा अहवाल आल्यावरच...नवापूर तालुक्यात हजारो कोंबड्याचा मृत्यू झाल्याने नंदुरबार पशुसंवर्धन विभागांच्या अधिकाऱ्यांसह महसूल अधिकाऱ्यांनी भेट देऊन पोल्ट्री क्षेत्राची पाहणी करून पंचनामे केले.     यासंदर्भात नऊ कोंबड्यांचे अहवाल पुणे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्यानंतर भोपाल येथे  तपासणी केली जाईल त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे ७० डिग्री सेल्सिअस पर्यंत पाच मिनिटापर्यंत अंडे व चिकन शिजवल्यास त्याच्यापासून बर्ड फ्लू होत नाही. अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त आर. बी. पाटील यांनी दिली आहे.

प्रशासनाने अलर्ट झोनमध्ये केलेल्या उपाययोजना प्रभावी क्षेत्राच्या ठिकाणी वाहनांच्या ये-जा करण्यास मनाई करण्यात आली असून खाजगी वाहने बाहेर लावण्यात येणार आहेत. जीवंत व मृत वन्यपक्षी, कुक्कुटपक्षी, अंडी, कोंबडीखत, पशुखाद्य अनुषंगीक साहित्य व उपकरण आदी वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. पोल्ट्रीमध्ये मालक व कर्मचारी यांनी योग्य ती खबरदारी घेऊन कामकाज करावे, पोल्ट्री वेळोवेळी निर्जंतवणूक करावी. प्रभावीत परिसर दोन टक्के सोडियम हायड्रोक्लोराईट, पोटॅशियम परमॅगनेटद्वारे निर्जंतूक करावे. परिसरातील वन्यपक्षी, कुक्कुटपक्षी संबधीच्या सर्व नोंदी अद्यावत ठेऊन दक्षता घ्यावी.मृत पक्षी, कोंबटी उघड्यावर टाकू नये तसेच त्यांची शास्त्रीय दृष्टीने विल्हेवाट स्थानिक स्वराज्य संस्थांनी लावावी.आवश्यक त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात यावा.

तालुक्यातील पाच पोल्ट्री फार्म मध्ये सामान्य पेक्षा पक्षांचे दगावण्याचे प्रमाण वाढले आहे.  दगवण्याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. राणीखेत आजाराने देखील कोंबड्यांचा मृत्यू होतो. बर्ड फ्यूल झाल्याची माहिती चुकीची आहे. भोपाल प्रयोग शाळेचा अहवाल आल्यावरच खरे निदान निष्पन्न   होऊ शकेल. नवापुर तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायिक जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे. रोज कोंबड्याचा मृत्यूचा अहवाल दिला जात आहे.-अरिफ बलेसरिया,अध्यक्ष, पोल्ट्री असोसिएशन,