नवापूरच्या नगरसेवकाला दारु तस्करीत गुजरात राज्यात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:31 IST2021-03-10T04:31:50+5:302021-03-10T04:31:50+5:30

गुजरात राज्यातील उकई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कारमध्ये (क्रमांक एम.एच.३९व्ही-३९९९) भारतीय बनावटची इंग्लिश दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना ...

Navapur corporator arrested in Gujarat for smuggling liquor | नवापूरच्या नगरसेवकाला दारु तस्करीत गुजरात राज्यात अटक

नवापूरच्या नगरसेवकाला दारु तस्करीत गुजरात राज्यात अटक

गुजरात राज्यातील उकई पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी कारमध्ये (क्रमांक एम.एच.३९व्ही-३९९९) भारतीय बनावटची इंग्लिश दारूची अवैधरित्या वाहतूक करीत असताना गुजरात राज्यातील गुणसदा नवागावफळ्यानजीक सात किलोमीटर अंतरावर गुजरात पोलिसांनी पकडली. कारमध्ये लहान मोठे दारूचे स्टिन ४८नग, ३० लीटर दारू अशी १४ हजार ४०० रुपयांची दारू, गाडीची किंमत तीन लाख रूपये व ३८ हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण तीन लाख ५२ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

यासंदर्भात नवापूर शहरातील जनता पार्क परिसरातील रहिवासी व अपक्ष नगरसेवक विशाल केशव सांगळे (३१), किसन अजय मेहता (२७, रा.शिवाजी रोड, दत्त मंदिर परिसर, नवापूर),दानियल साकऱ्या गामीत (२८, रा.फुलवाडी, ता.उच्छल, गुजरात) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना गुजरात राज्यातील उकई पोलिसांनी अटक केल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली.

Web Title: Navapur corporator arrested in Gujarat for smuggling liquor