शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात उमेदवारांसह समर्थकांच्या गर्दीमुळे तहसीलला यात्रेचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 12:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा येथे तहसील कार्यालय आवारात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने परिसराला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा येथे तहसील कार्यालय आवारात उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांचे घर व डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केल्याने राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात गर्दी केली होती. सर्व कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्व इच्छुक उमेदवारांनी तहसील कार्यालयात जाऊन आपले अर्ज दाखल केले. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या बंगल्यावर सकाळपासून गर्दी केली होती. इच्छुक उमेदवारांचे अर्ज माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजित पाटील व कार्यकर्त्यांनी भरून घेतले तेथून एकत्रितपणे तहसील कार्यालयात जाऊन आपले अर्ज दाखल केले. आज डोंगरगाव रस्त्यावरील शिवसेना कार्यालयातही दिवसभर धावपळ सुरू होती. माजी जिल्हाप्रमुख अरुण चौधरी तालुकाप्रमुख मधुकर मिस्त्री यांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज दाखल केले.भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढविण्याचे घोषित केल्यानंतर आज सर्व जागांसाठी एकत्रितपणे अर्ज दाखल करण्यात आले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी आघाडी झाली नसल्याने या तीनही पक्षांतर्फे स्वतंत्रपणे अर्ज दाखल करण्यात आल्याने तालुक्यातील बहुतेक ठिकाणी चौरंगी लढती होतील अशी शक्यता आहे. प्रांत अधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी अर्ज स्वीकारले.तालुक्यातून ३०९ अर्ज दाखल करण्यात आले. १४ गटांसाठी १३७ व पंचायत समितीच्या २८ गणांसाठी १७२ इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. सोमवारी अखेरच्या दिवशी मात्र अर्ज दाखल करण्यासाठी झुंबड उडाली होती. आज अखेरचा दिवशी सर्वांनीच आपापल्या समर्थकांसह अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली होती. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चेतन गिरासे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी नामांकन पत्र स्विकारले. यात लोणखेडा गटातून जयश्री उर्फ कांचन दीपक पाटील, पाडळदा गटातून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धनराज पाटील यांनी भाजपाकडून नामांकन अर्ज दाखल केला तर काँग्रेसतर्फे अभिजीत पाटील यांनी तर माकपा कडून दिपक जगन्नाथ पाटील यांनी अर्ज दाखल केला. म्हसावद गटातून अभिजीत पाटील काँग्रेस कडून, डॉ. भगवान पाटील यांनी भाजपाकडून नामांकन अर्ज दाखल केले. कहाटूळ गटातून प्रतिभा न्हानू माळी, शिवसेना, मीना आत्माराम बागले काँग्रेस, शालू भटू सनेर आदींनी नामांकन दाखल केले आहेत.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व माजी सदस्य ऐश्वर्या रावल यांनी कोणत्याही गटात नामांकन अर्ज दाखल केलेले नाहीत. यावेळी ते निवडणुकीपासून लांबच असल्याचे दिसून आले.