शहादा महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST2021-02-26T04:44:36+5:302021-02-26T04:44:36+5:30

परिषदेच्या विषय ‘इम्पॅक्ट ऑफ आयसिटी ऑन लायब्ररी ॲज लर्निंग रिसोर्सेस’ हा होता. परिषदेत देशभरातून सुमारे ४०० व्यक्तींनी सहभाग नोंदवला. ...

National e-Council at Shahada College | शहादा महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषद

शहादा महाविद्यालयात राष्ट्रीय ई-परिषद

परिषदेच्या विषय ‘इम्पॅक्ट ऑफ आयसिटी ऑन लायब्ररी ॲज लर्निंग रिसोर्सेस’ हा होता. परिषदेत देशभरातून सुमारे ४०० व्यक्तींनी सहभाग नोंदवला. परिषदेचे उद्घाटक डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे संचालक तथा ज्ञान संसाधन केंद्र औरंगाबादचे डॉ.धर्मराज वीर हे होते. प्रमुख अतिथी म्हणून अलाहाबाद विश्वविद्यालयाचे डॉ.बी.के. सिंग होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी संस्थेची तसेच महाविद्यालयातील विविध उपक्रमांची माहिती देत संवाद साधला. प्रथम सत्रात डॉ.धर्मराज वीर यांनी सपोर्ट फोर अपग्रेडेशन ऑफ कॉलेज इन नॅक प्रोसेस या विषयावर तर दुसऱ्या सत्रात डॉ.बी.के. सिंग यांनी इम्पॅक्ट ऑफ आयसीटी ऑन लाईब्ररी इटस सर्व्हिसेस या विषयावर मार्गदर्शन केले. होता. परिषदेत प्रश्नोत्तरे घेण्यात आली. या वेळी जयंत देशपांडे, दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ई-परिषदेसाठी संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष जगदीश पाटील, सचिव कमलताई पाटील, समन्वयक पी.आर. पाटील, प्रा.मकरंद पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.एम.के. पटेल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.मृणाल जोगी व प्रा.डॉ.मिलिंद पाटील यांनी तर आभार ग्रंथपाल प्रा.बी.एस. पाटील यांनी मानले. परिषदेसाठी विशाल पाटील, आर.एस. शेख, एस.बी. माळी आदींनी सहकार्य केले.

Web Title: National e-Council at Shahada College