शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी ठेकेदार मिळेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : नेत्रंग ते शेवाळी या राष्ट्रीय महामार्गाची तळोद्यापासून तर थेट गुजरात हद्दीजवळील गव्हाळीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : नेत्रंग ते शेवाळी या राष्ट्रीय महामार्गाची तळोद्यापासून तर थेट गुजरात हद्दीजवळील गव्हाळीपर्यंतच्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी संबंधीत यंत्रणेने टेंडरदेखील काढले होते. मात्र काम करण्यासाठी ठेकेदार पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे. परिणामी रस्त्याची दुरूस्तीही रखडली आहे.नेत्रंग ते शेवाळी हा राष्ट्रीय महामार्ग ७३ ब म्हणून ओळखला जात असतो. तथापि या रस्त्याची तळोद्यापासून तर थेट गव्हाळी म्हणजे गुजरात हद्दीपर्यंत अत्यंत दुरवस्था झाली आहे. येथील अवजड वाहतुकीमुळे मोठ-मोठे खड्डे पडलेले आहेत. या रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशीच अवस्था महामार्गाची झाली आहे. रस्त्याच्या अशा अवस्थेमुळे वाहनधारक अक्षरश: वैतागले आहेत. त्यातच रस्त्यावर अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्यामुळे रस्त्याची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्याच बरोबर लोकप्रतिनिधींकडे वाहनधारकांनी लक्ष वेधले होते. या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी ठेकेदार मिळेणा महामार्गाच्या धुळे विभागाने रस्त्याची दुरूस्ती मंजूर करून त्यासाठी साधारण सात कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. रस्त्याच्या कामाचे टेंडर सुद्धा काढण्यात आले होते. परंतु काम करण्यासाठी ठेकेदारच पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे. पुन्हा नवीन टेंडरची प्रक्रिया राबविणार असल्याचे सूत्रांनी सांगितले जात आहे.वास्तविक सन २०११ मध्ये या रस्त्याला राज्य मार्गावरून राष्ट्रीय महामार्ग दुरूस्तीसाठी ठेकेदार मिळेणा महामार्गाचा दर्जा देण्यात आला आहे. साहजिकच त्याची देखभाल, दुरूस्ती व नूतनीकरणाकरीता ठोस कार्यवाही करण्याची आवश्यकता आहे. परंतु तसे झाले नाही. केवळ थातूर-मातूर दुरूस्ती केली जात असते. वर्षभरापूर्वी अक्कलकुवा ते वाण्याविहीर पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र निकृष्ठ कामाच्या दर्जामुळे त्याचीही अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे सातत्याने वाहनांचा तांत्रिक बिघाडाचासामना वाहनधारकांना करावा लागत आहे. यात वेळ व पैसाही वाया जात असल्याचे वाहनचालक सांगतात. अवजड वाहनचालकांना तर तांत्रिक बिघाडामुळे रात्र-रात्र रस्त्यावरच खिळून राहावे लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. या महामार्गाची अत्यंत शोचनीय अवस्था लक्षात घेऊन संबंधीत यंत्रणेने पुन्हा नवीन प्रक्रिया राबवून दुरूस्तीचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी आहे.तळोद्यापासून थेट गव्हाळीपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यातही नळगव्हाणपासून तर खूपच दुर्दशा झाली आहे. त्यामुळे मोटारसायकली व लहान चारचाकी वाहनधारक कुकरमुंडाकडून फुलवाडी गुजरातमार्गे मोरंबा मार्गे तब्बल १० ते १५ किलोमीटर अंतराचा फेरा मारत जात असतात. या पर्यायी रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ सुरू झाल्याने त्याचीदेखील दुरवस्था होत आहे. वास्तविक वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यातही अवजड वाहनांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे रस्त्याच्या कामाबाबत संबंधीत यंत्रणेने सुद्धा अलर्ट राहिले पाहिजे. मात्र त्याकडे पाहिजे तसे लक्ष घातले नसल्याचा वाहनचालकांचा आरोप आहे.हा महामार्ग केंद्र सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे. कामाची निविदा कमी किमतीची निघाल्यामुळे कोणताही ठेकेदार काम घ्यायला तयार नाही. मी वैयक्तिक पातळीवर एका ठेकेदाराला तयार केले आहे. त्यामुळे लवकरच निविदा मंजूर करून कामास सुरूवात होणार असल्याचे आमदार राजेश पाडवी यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले होते.