शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
3
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
4
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
5
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
6
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
7
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
8
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
9
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
10
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
11
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
12
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
13
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
14
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
15
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
16
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
17
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
18
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
19
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
20
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
Daily Top 2Weekly Top 5

डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:44 IST

नंदुरबार- डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी करण्याची धुरा सर्व क्रीडा शिक्षकांवर असून सदर स्पर्धा आयोजनासह नियोजनात सहभागी व्हावे. ...

नंदुरबार- डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धा यशस्वी करण्याची धुरा सर्व क्रीडा शिक्षकांवर असून सदर स्पर्धा आयोजनासह नियोजनात सहभागी व्हावे. नंदुरबारला व्हॉलिबॉलच्या राष्ट्रीयस्तरावरील स्पर्धा आयोजनाचा बहुमान मिळाला आहे. यासाठी क्रीडा शिक्षकांसह सर्वांनी खारीचा वाटा म्हणून आयोजनात योगदान द्यावे, असे आवाहन जि.प.चे माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी केले.

नंदुरबार येथे दि१३ व १४ मार्चला आयोजित डायरेक्ट व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धांच्या नियोजनासाठी काल दि.२५ फेब्रुवारीला नंदुरबार शहरातील डी.आर.हायस्कूलमध्ये जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनची नियोजन बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, नंदुरबार जिल्हा डायरेक्ट व्हॉलिबॉल असोसिएशनचे कार्याध्यक्ष व मुख्य स्पर्धा नियंत्रक योगेंद्र दोरकर, सचिव प्रा.डॉ.ईश्वर धामणे, कोषाध्यक्ष बळवंत निकुंभ आदी उपस्थित होते. बैठकीच्या सुरुवातीला कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर यांनी प्रास्ताविकातून व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनासह नियोजनाची माहिती दिली. या स्पर्धांमध्ये देशभरातील विविध राज्यातून पुरुषांच्या २० संघामध्ये २३४ पुरुष खेळाडू व महिलांच्या आठ संघामध्ये १०४ महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. त्यासाठी सर्व क्रीडा शिक्षकांसह क्रीडाप्रेमींचे नियोजनात योगदान असणे महत्त्वाचे आहे. म्हणून स्पर्धेसाठी आयोजन-नियोजनाच्या विविध समित्या गठीत करण्यात येत असून क्रीडा शिक्षकांनी तांत्रिक दृष्टीने स्वतःहून समित्या गठीत करण्यासाठी सहकार्य करावे. सदर स्पर्धांसाठी स्वयंसेवकांचेही आयोजनात योगदान लाभणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम म्हणाले की, कुठल्याही स्पर्धा यशस्वी करतांना समन्वय असणे महत्त्वाचे असते. नंदुरबार जिल्ह्याची गुणवत्ता वाढविण्यासह नाव उज्ज्वल करण्यासाठी आयोजित डायरेक्ट व्हॉलिबॉलच्या राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीतेसाठी सर्वांनी मनापासून काम करावे. या स्पर्धांकरिता जिल्हा शिक्षण विभाग व क्रीडा विभागाकडून पूर्ण सहकार्य असणार असल्याचे सांगून त्यांनी शुभेच्छा दिल्या. या बैठकीत डायरेक्ट व्हॉलिबॉल राष्ट्रीय स्पर्धांच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्रा.निशिकांत शिंपी, प्रा.श्रीराम मोडक, प्रा.डॉ.मयूर ठाकरे, प्रा.डॉ.डी.डी. राठोड, भागुराव जाधव, नितीन कबाडे, प्रा.डॉ. उमेश शिंदे, बंडू भदाणे, के.एस.पिंजारी, एस.एस.सूर्यवंशी, खुशाल शर्मा, नंदू पाटील, सुनील निकुंबे, प्रवीण सोनवणे, रमेश शिरसाठ, नंदुगिरी गोसावी, रवींद्र सोनवणे, एम.एफ.वळवी, एस.डी.घाटे, एस.व्ही.विसपुते, जावेद बागवान, डॉ.टीएल.दास, एस.व्ही. अहिरे, अनिल रौंदळ, शरीफ बागवान, जितेंद्र पाटील, दीपक निकुंभ, डी.एन.मराठे, वाय.एस.राठोड, पी.व्ही.सोनार, ए.एच.तेलगोटे, आर.बी.मोरे, दीपेश धामणे, अकील पिंजारी यांच्यासह जिल्ह्यातील क्रीडा शिक्षक, क्रीडा प्रेमी व रसिकांनी उपस्थित होते.