शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारच्या लाल मिरची उद्योगाला आता पिवळ्या हळदीची जोड

By admin | Updated: April 24, 2017 13:47 IST

नंदुरबारात आता मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे.

ऑनलाईन लोकमत विशेष /रमाकांत पाटील 
नंदुरबार, दि.24- मिरचीसाठी राज्यात सर्वदूर परिचित असलेल्या नंदुरबारात आता हळद उत्पादनालाही चालना मिळत असून मिरची पावडरच्या लालीला हळदीच्या पिवळ्या रंगाची जोड मिळाल्याने जिल्ह्यात मसाला उद्योगाला तेजी आली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकेकाळी मिरचीचे प्रचंड उत्पादन घेतले जात होते. त्यामुळे हंगामात येथील बाजार समितीत रोज जवळपास पाच हजार क्विंटलपेक्षा अधिक मिरची विक्रीसाठी येत होती. ही मिरची व्यापारी खरेदी करून ते वाळविण्यासाठी शहराबाहेरील पथारीवर टाकत होते. त्यामुळे शहरात प्रवेश करताच प्रत्येकाला शेकडो एकर परिसरातील लालजर्द पथा:या सर्वानाच आकर्षीत करीत असे. त्यावरूनच नंदुरबारची ओळख मिरचीचे शहर म्हणून परिचीत झाले होते. पण गेल्या दहा वर्षापासून विविध कारणांनी मिरचीचे उत्पादन कमी झाले. सहाजिकच येथील मिरची उद्योजकांना सध्या बाहेरून मिरची आणावी लागते.  मिरची उद्योगाची ही घसरण सुरू असतांनाच त्याला जोड आता हळदीची मिळत आहे.
गेल्या दोन-तीन वर्षापासून जिल्ह्यातील शेतकरी हळद लागवडीकडे वळले आहेत. यावर्षी देखील एक हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड झाली होती. हळदीला स्थानिक स्तरावर पूर्वी बाजारपेठ नसल्याने शेतक:यांचे हाल होत होते. त्याला पर्याय म्हणून काही मिरची उद्योजकांनी मिरची बरोबरच हळद पावडरही तयार करण्याचा उद्योग सुरू केला. शेतातून हळद काढल्यानंतर त्याला ‘बॉईल’ करण्याची प्रक्रिया अवघड असते. ही प्रक्रिया जिल्ह्यात काही ठिकाणी शेतक:यांनी एकत्र येवून सुरू केली. एक-दोन उद्योजकांनीही पुढाकार घेवून त्याला व्यापक स्वरूप दिले. त्यामुळे स्थानिक स्तरावरच हळदीची खरेदी होऊन त्याची पावडर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
नंदुरबार शहरात सध्या काही मिरची उद्योजक हळद पावडर बनवून ते बाहेर विक्री करतात. एका उद्योजकाने या प्रकल्पाला व्यापकता दिली आहे. त्या उद्योजकाकडे दरवर्षी साधारणत: सात हजार क्विंटलपेक्षा अधीक हळद शेतक:यांकडून खरेदी करून त्याची पावडर बनवून ती मिरची पावडर बरोबरच देशभरात पाठविली जात आहे. या उद्योगामुळे हळद उत्पादक शेतक:यांनाही प्रोत्साहन मिळाले आहे.
एक हजार क्विंटलपेक्षा जास्त हळद पावडरची निर्मिती
जिल्ह्यातील काही शेतकरी हळद बॉईल करून ती सांगली बाजारपेठेत विक्रीला नेतात. तर काही शेतकरी स्थानिक व्यापा:यांकडेच विक्री करतात. व्यापा:यांनीही हळद पावडर उत्पादनाला सुरुवात केल्याने दरवर्षी जवळपास एक हजार क्विंटलपेक्षा जास्त पावडरची निर्मिती करून ते देशभरात विक्रीला पाठवित असल्याची माहिती उद्योजक सुनील अग्रवाल यांनी दिली.