शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार, शहादा पंचायत समिती उपसभापतींचेही सदस्यत्व रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा पंचायत समितीचे एकूण १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यात ...

नंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा पंचायत समितीचे एकूण १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यात शहादा व नंदुरबार पंचायत समिती उपसभापतींचाही समावेश आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. शहादा व नंदुरबार पंचायत समितीत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे या निर्णयाचा भाजपला फटका बसला आहे.

ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्याने जिल्हा परिषदेचे ११ गटातील तर पंचायत समितीच्या १४ गणातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. सदस्यत्व रद्द झालेले सर्वच सदस्य हे राजकीय वलय असलेले असल्यामुळे जिल्ह्यात या माध्यमातून राजकीय भूकंपच झाला आहे.

उपसभापतींचे पद रद्द

या निर्णयाचा सर्वाधिक फटका हा शहादा व नंदुरबार पंचायत समितीला बसला आहे. शहादा पंचायत समितीमधील आठ, नंदुरबार पंचायत समितीतील पाच तर अक्कलकुवा पंचायत समितीच्या एका सदस्याचा यात समावेश आहे. पद रद्द झालेलेे उपसभापतींमध्ये शहाद्याचे उपसभापती रवींद्र पाटील यांचा समावेश आहे. ते जावदेतर्फे बोरद या गणातून निवडून आले आहेत.

नंदुरबार पंचायत समितीच्या उपसभापती लताबाई पाटील यांचेही पद रद्द झाले आहे. त्या पातोंडा या गणातून निवडून आल्या आहेत.

शहाद्यात उरले १२ सदस्य

शहादा पंचायत समितीचे आठ सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता या पंचायत समितीत केवळ १२ सदस्य उरले आहेत. येथे एकूण २० सदस्य आहेत. भाजपची सत्ता असून काँग्रेस मुख्य विरोधी पक्ष आहे.

नंदुरबारात १५ सदस्य

नंदुरबार पंचायत समितीमध्येही एकूण २० सदस्य आहेत. पाच सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाल्याने आता येथे देखील १५ सदस्य उरले आहेत.

अक्कलकुवा पंचायत समितीच्या कोराई गण हा ओबीसी प्रवर्गासाठी होता. तेथील सदस्य विजयता दिलीप बोरसे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.