शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
6
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
7
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
8
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
9
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
10
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
11
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
12
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
13
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
14
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
15
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
16
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
17
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
18
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
19
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
20
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारपासून नर्मदापर्यंत सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनाच्या विरोधातील युद्धासाठी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील जनतेने एकजूट दाखवत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाच्या विरोधातील युद्धासाठी जिल्ह्यातील सर्वच स्तरातील जनतेने एकजूट दाखवत प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला. सकाळी सात वाजेच्या आतच अनेकांनी यात सहभाग घेतला. रात्री १२ वाजेपासूनच जिल्ह्याच्या सिमा सील करण्यात आल्या. एकही वाहन जिल्ह्यात येवू दिले नाही किंवा जिल्हाबाहेर जावू देण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यांवर दिवसभरात एकही वाहन दिसून आले नाही. रेल्वे सेवा देखील ठप्प होती केवळ नवजीवन एक्सप्रेस आणि सिकंदराबाद-नांदेड ंआणि आणखी दोन एक्सप्रेस रेल्वेस्थानकावर आल्या. उधना-पाळधी मेमू ट्रेनला शनिवारी रात्रीपासूनच नंदुरबार स्थानकात थांबवून ठेवण्यात आले होते. बसस्थानकात शुकशुकाट होता. प्रवासीच नसल्याने एकही बस फेरी झाली नाही.नंदुरबार शहरात सर्वत्र निरव शांतता होती. वाहनांचे आवाज नाही, विक्रेत्यांची फेरी नाही, बांधकामाच्या ठिकाणी ठोकपीठ नाही की गल्लीबोळात आणि मैदानांवर खेळणाऱ्यांचा आरडाओरड नाही अशी निरव शांतता नंदुरबारकरांनी पहिल्यांदाच अनुभवली. सर्वच कुटूंबांनी घरातच कुटूंबियांशी विविध खेळात मन रमवले. काहींनी घरातील साफसफाईला महत्व दिले तर काहींनी वाचन आणि टीव्ही पहाण्यात मन रमविले.शहरी भागातच नाही तर सातपुड्याच्या दुर्गम भागातील अक्कलकुवा, मोलगी, धडगाव, तोरणमाळ यासारख्या भागात देखील जनता कर्फ्यू पाळण्यात आला. नंदुरबार ते थेट नर्मदा काठावरील गावांपर्यंत याची जाणीवजागृती झाल्याने लोकांनी हा बंद स्वयंस्फूर्तीने पाळला.दोघांना नेले रुग्णालयातहोम कॉरेंटाईन असलेले दोन जण रेल्वेने नंदुरबारात पहाटे आले. त्यानंतर ते आपल्या गावी जाण्यासाठी नंदुरबार बसस्थानकात आले. तेथे काहींनी त्यांना पाहिल्यानंतर लागलीच १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेला कळविण्यात आले. पहाटे पाच वाजता रुग्णवाहिका बसस्थानकात आल्यावर दोनी कॉरेंटाईन असलेल्या युवकांना घेवून सिव्हीला नेले. तेथे त्यांची तपासणी करण्यात आली. होम कॉरेंटाईन असतांनाही त्यांनी रेल्वेने प्रवास केला नंतर बसने प्रवास करण्यासाठी ते जाणार होते. असाच एक रुग्ण नंदुरबार तालुक्यातील एका गावात फिरत होता. ग्रामस्थांनी त्याला घरात राहण्यास सांगूनही त्याने न ऐकल्याने अखेर ग्रामस्थांनी आरोग्य विभागाला कळविल्यानंतर त्याला नंदुरबारला नेण्यात आले.१४ युवकांची तपासणीदक्षिण भारतात देव दर्शनासाठी गेलेले १४ युवक नवजीवन एक्सप्रेसने सकाळी ११ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकात उतरले. त्यांची लागलीच तातडीने रेल्वे स्थानकातील आरोग्य पथकाने तपासणी केली. परंतु त्यांना कोणतीच लक्षणे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना घरी जावू देण्यात आले. याच युवकांची विजयवाडा येथे रेल्वेने प्रवास करण्याआधी तेथील आरोग्य पथकाने देखील तपासणी केली होती. युवकांच्या म्हणण्यानुसार पुर्ण प्रवासात बाहेरचे काहीही खाल्ले नाही. सह प्रवाशांशी दूरूनच राहिल्याचे त्यांनी सांगितले.सिमेवर तपासणी पथकमहाराष्टÑ व गुजरात राज्याच्या सिमेवर वाका चार रस्ता येथे गुजरात व महाराष्टÑाचे संयुक्त तपासणी पथक नेमण्यात आले होते. नंदुबार जिल्ह्यात येणाºया प्रत्येकाची येथे तपासणी केली जात होती.एकही वाहन किंवा एकही व्यक्ती त्यातून सुटू नये याची काळजी घेतली जात होती. त्यासाठी पथकातील गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.तडवी, पोलीस उपनिरिक्षक राकेश शिरसाठ, हरेश्वर पोतदार, राकसवाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी तैणात होते. शहादा तालुक्यातील रायखेड, गव्हाळी, ता.अक्कलकुवा, बेडकीपाडा, ता.नवापूर, ठाणेपाडा, ता.नंदुरबार, रनाळे, ता.नंदुरबार या ठिकाणी देखील पथके तैणात करण्यात आली आहेत.

नंदुरबार : थेट नंदुरबार शहरापासून ते दुर्गम भागातील नर्मदा काठापर्यंतच्या जिल्हावासीयांनी जनता कर्फ्यूमध्ये सहभागी होत कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी एकजूट दाखविली. रविवारी दिवसभर जिल्हाभरात शुकशुकाट होता. सर्व व्यवहार ठप्प झाले होते. नागरिकांनी घरात बसूनच दिवस घालवला. सायंकाळी पाच वाजता अत्यावश्यक सेवेतील लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेकजण खिडक्यांमध्ये, गॅलरीत, घराच्या गच्चीवर, अंगणात येत थाळी वाजवत, घंटानाद करीत, टाळचा गजर करीत आणि टाळ्या वाजवत वातावरण निर्मिती केली. त्यानंतर मात्र, जनता कर्फ्यूमध्ये काहीशी शिथीलता दिसून आली.