शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात मोकाट कुत्र्यांनी बालिकेचा बळी घेतल्याने हळहळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 12:30 IST

n  लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नेहरू नगर भागातील बालिकेचा कुत्र्याच्या ...

n  लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरात मोकाट कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. नेहरू नगर भागातील बालिकेचा कुत्र्याच्या चाव्यामुळे मृत्यू झाला. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची असतांना देखील त्याकडे पालिकेने दुर्लक्ष केल्यानेच बालिकेला आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप होत आहे. हिताशी महाजन (वय सहा) रा. नेहरूनगर, नंदुरबार असे बाालिकेचे नाव आहे. सहा दिवसांपूर्वी बालिका आपल्या घरासमोर खेळत असतांना मोकाट कुत्र्यांच्या झुंडीत ती सापडली. कुत्र्यांनी तिचे लचके तोडले. तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार घेतांना शुक्रवारी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे. शहरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. ठिकठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी दिसून येतात. रात्रीच्या वेळी रस्त्याने चालणे देखील मुश्कील होते. दुचाकी स्वारांच्या मागे लागण्याचे प्रमाण तर अधीक आहे. त्यामुळे अनेकांचा अपघात झाल्याने ते जायबंदी झाले आहेत. मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासूनची आहे. परंतु त्याकडे पालिकेने फारसे गांभिर्याने पाहिले नसल्याचे चित्र आहे. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्र्यांचे निर्बजीकरण आणि त्यांना पकडून जंगलात सोडण्याचा ठराव देखील करण्यात आला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याची स्थिती आहे. बालिकेचा बळी गेल्यानंतर आतातरी पालिकेने गांर्भियाने घेत मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.