तळोदा महाविद्यालयास नॅक समितीची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:30 IST2021-02-13T04:30:59+5:302021-02-13T04:30:59+5:30

समितीने दोन दिवस महाविद्यालयाची सविस्तर पाहणी करून मूल्यांकन केले. त्यांनी विविध विभागांच्या प्रमुखांनी केलेले सादरीकरण, मागील सहा वर्षात महाविद्यालयाने ...

NAC Committee visits Taloda College | तळोदा महाविद्यालयास नॅक समितीची भेट

तळोदा महाविद्यालयास नॅक समितीची भेट

समितीने दोन दिवस महाविद्यालयाची सविस्तर पाहणी करून मूल्यांकन केले. त्यांनी विविध विभागांच्या प्रमुखांनी केलेले सादरीकरण, मागील सहा वर्षात महाविद्यालयाने राबविलेले विविध उपक्रम, शैक्षणिक प्रगती, प्रयोगशाळा, ग्रंथालय, जिमखाना, वनस्पतीशास्र उद्यान इत्यादी भौतिक सुविधांचा आढावा घेऊन विधायक सूचना केल्या.

महाविद्यालयाची शैक्षणिक प्रगती व भौतिक सुविधा यांच्याबाबत समाधान व्यक्त केले. समितीने महाविद्यालयाची व्यवस्थापन समिती, आजी व माजी विद्यार्थी तसेच शिक्षक-कर्मचारी यांच्यासोबत बैठका घेऊन विचार-विमर्श केला व त्यांची मते जाणून घेतली. या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद समितीने घेतला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

नॅकमार्फत होणाऱ्या मूल्यांकनासाठी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.एस.आर. मगरे व नॅक समन्वयक प्रा.जयपालसिंग शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. त्यासाठी त्यांना संस्थेचे अध्यक्ष प्रा.सुधीरकुमार माळी व व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.

Web Title: NAC Committee visits Taloda College