शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

माझी कन्या भाग्यश्री योजनेतून अवघ्या 45 मुलींना लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : भ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना गेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : भ्रूण हत्या थांबवून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी राज्य शासनाने माझी कन्या भाग्यश्री ही योजना गेल्या दोन वर्षापासून सुरू केली असली तरी या दोन वर्षात संपूर्ण जिल्ह्यात 45 मुलींनाच आजतागायत लाभ मिळाला आहे. योजनेबाबत पालक अनभिज्ञ असल्यामुळे योजनेलाही समाधानकारक प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून येते. त्यामुळे संबंधीत प्रशासनाने गाव पातळीवर जनजागृती करण्याची अपेक्षा आहे.लिंग निवडीस प्रतिबंध घालून मुलींचा जन्मदर वाढविणे, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे याशिवाय त्यांचा आरोग्याचा दर्जा वाढवावा. यासाठी राज्यशासनाने सुकन्या योजनेच्या धर्तीवरच माझी सुकन्या भाग्यश्री ही योजना सन 2017 मध्ये सुरू केली आहे. या योजनेंतर्गत समाजातील साडेसात लाख रुपये उत्पन्न असणा:या सर्व पालकांना त्याचा लाभ देण्यात येतो.  या कुटुंबास एक किंवा दोन मुली असणे अपेक्षित आहे. या दोनच मुलींवर संबंधीत आई-वडीलांनी दोघांपैकी एकाचा संतती नियमनाची शस्त्रक्रियाचा दाखला आवश्यक आहे. अशाच लाभार्थी पात्र ठरतात. ज्या पालकांना एक मुलगी असेल तिच्या नावावर शासन 50 हजार तर दुसरी मुलगी असेल तिच्या नावावर 25 हजार अशी फिक्स डिपॉझीट महाराष्ट्र बँकेत आई व मुलीच्या संयुक्त बँकेत शासन ठेवत असते. ही मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर ती रक्कम काढता येते. शासनाच्या या चांगल्या योजनेमुळे निश्चितच मुलींच्या आई-वडीलांना आर्थिक मदत होऊन काळजीदेखील कमी होणार आहे. तथापि या योजनेला नंदुरबार जिल्ह्यात अत्यंत अल्पप्रतिसाद अशा पालकांकडून मिळत असल्याचे चित्र आहे. कारण गेल्या दोन वर्षात केवळ 45 मुलींनाच योजनेचा फायदा मिळाला आहे. एकात्मिक बालविकास प्रकल्पाकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार व नवापूर वगळता तळोदा, अक्कलकुवा, धडगाव या तीन आदिवासी तालुक्यांमध्ये तर लाभाथ्र्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. तळोद्यात दोनच लाभाथ्र्याना लाभ मिळाला आहे. अक्कलकुवा एक तर धडगावात एकही लाभार्थी उपलब्ध झालेला नाही.शहादा हा पुढारलेला तालुका असतांना तेथेही दहाच लाभाथ्र्यानी योजनेचा लाभ घेतला आहे. यंदा तर एकही लाभार्थीचा प्रस्ताव त्या-त्या तालुक्यातील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाकडे दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले. वास्तविक योजना अतिशय चांगली आहे. मात्र तिच्या प्रभावी अंमलबजावणीअभावी प्रकल्प कार्यालयांना लाभार्थीच  मिळत नसल्याचे चित्र आहे. बालविकास प्रकल्पांचा जनजागृतीचा दावा केला जात असला तरी ग्रामीण भागात या योजनेबाबत पालक अन्भिज्ञ असल्याचे म्हटले जात         आहे. जिल्हा परिषद व एकात्मिक बालविकास प्रकल्पामार्फत ही योजना राबविली जात असल्याने या दोन्ही यंत्रणांनी गाव-पातळीवर जावून अशा पालकांमध्ये जनजागृती केली पाहिजे. तरच योजनेस चांगला प्रतिसाद लाभून शासनाचा मुळहेतूदेखील सफल होईल. मात्र यासाठी दोन्ही यंत्रांनी उदासिनता झटकण्याची गरज आहे. दोन वर्षात या योजनेतून 22 हजार 50 लाख रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.

तालुके    लाभार्थी संख्या वर्ष               2017-18    2018-19नंदुरबार    07    06शहादा     06    05नवापूर     06    07तळोदा      00    02

अक्कलकुवा    00  01धडगाव    00    00एकूण    19    21