शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

मुस्कानने 241 बालकांना केले पालकांच्या स्वाधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2020 12:16 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  पोलिसांच्या  ‘मुस्कान’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अपहृत, हरवलेले, भिक्षा मागणारे व इतर असे  आतापर्यंत तब्बल ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  पोलिसांच्या  ‘मुस्कान’ या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात अपहृत, हरवलेले, भिक्षा मागणारे व इतर असे  आतापर्यंत तब्बल २४१ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. यंदाची ही नववी मोहिम असून तिचा समारोप ३१ डिसेंबरला होणार आहे. या मोहिमेसाठी जिल्हा पोलीस दलातर्फे वेगळे पथक नियुक्त करण्यता आले असून यासाठी बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्थांचेही सहकार्य घेण्यात येत आहे.राज्यात २०१४ पासून ॲापरेशन मुस्कान ही मोहिम दरवर्षी १ ते ३१ जुलै या दरम्यान राबविली जाते. या मोहिमेअंतर्गत अपहृत अल्पवयीन बालके, बेवारस, भिक मागणारे, कचरा गोळा करणारे, समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वंचीत राहणाऱ्या अल्पवयीन मुुला-मुलींचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे किंवा बालसंरक्षणगृहे यांच्याकडे सुपुर्त करण्यात येत असतात. यानुसार आतापर्यंत एकुण आठ मोहिमा राबवून अनेक बालकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न राज्यासह जिल्हा पोलीस दलाने केला आहे.यंदा जानेवारी ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपुर्ण जिल्ह्यात नववी मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाण्याअंतर्गत तिचा समावेश आहे. त्यात प्रत्येक पोलीस ठाण्यातून एक अधिकारी, चार अंमलदारांचे स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आलेले आहे. याशिवाय जिल्हा बालकल्याण समिती, जिल्ह्यातील बाल संरक्षण गृहे, बालकांसाठी काम करणाऱ्या अशासकीय संस्था, बाल पोलीस पथकातील अधिकारी, अंमलदार यांचादेखील सदर मोहिमेत सहभाग आहे. पोलीस अधीक्षकांनी समन्वय बैठका घेऊन जिल्ह्यात मोहिम यशस्वीपणे राबविली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार, सर्व उपअधीक्षक व पोलीस ठाणे प्रभारी यांचा त्यात सहभाग होता.

२५ हरविलेल्या बालकांचाही समावेश  या कार्यवाहीमध्ये अपहृत किंवा पळून गेलेली तीन बालके. हरविलेले २५ बालके यांच्यासह बालकामगार, भिक्षा मागणारे, भंगार गोळा करणारे असे एकुण २४१ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यात आले. जिल्ह्यातील रेल्वेस्थानके, बसस्थानके, धार्मिक स्थळे, हाॅटेल्स, ढाबे या ठिकाणी शोध मोहिम राबविण्यात आली होती. याशिवाय पळून गेलेली किंवा अपहृत बालकांना विशेष तपास पथकांकडून शोधण्यात आले.