शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

कोळदा ते खेतिया रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने स्थानिक गावकरी व ...

कोळदा ते खेतिया रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम गेल्या तीन वर्षापासून सुरू आहे. काही ठिकाणी काम अपूर्ण असल्याने स्थानिक गावकरी व वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शिवाय रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडते. धुळीमुळे अनेक छोटे-मोठे अपघात होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. संबंधित ठेकेदार आणि रस्त्यावर होणाऱ्या अवजड वाहतुकीचा विचार करता अपूर्ण काम त्वरित पूर्ण करावे. शिवाय ज्या भागात धूळ उडते त्याठिकाणी निदान दिवसातून दोनवेळा तरी पाणी टाकणे आवश्यक आहे. या रस्त्यावर अवजड वाहने भरधाव वेगाने ये-जा करीत असल्याने धूळ मोठ्या प्रमाणावर उडते. शेतातील पिकांवर मोठ्या प्रमाणावर धूळ बसत असल्याने पिके खराब होत आहेत. आधीच निसर्गाच्या अवकृपेमुळे उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट येत आहे. त्यातच धुळीमुळे रस्त्यालगतच्या शेतातील पीक खराब होत असल्याने शेतकरी पुरता चिंताग्रस्त झाला आहे. प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित विभाग व ठेकेदाराला सूचना करून तत्काळ रस्ता करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

शहादा ते प्रकाशा दरम्यान रस्त्याचे अतिशय संथगतीने काम चालू आहे. कित्येक दिवस काम बंद असते आणि त्याचा परिणाम लोकांना सहन करावा लागतो. किरकोळ म्हणजे कमीत कमी दीड-दोन किलोमीटरचा रस्ता करणे बाकी आहे. पण तेवढ्यासाठी कोकम माता मंदिरापासून तर करजईच्या गावाच्या हद्दीपर्यंत दोन भागात काम बाकी आहे. रस्त्यावर वाहन चालवताना अतिशय हाल सहन करून वाहन चालवावे लागते. वाहनधारक खूप त्रस्त झाले आहेत. यात कित्येक मोटारसायकलस्वारांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. याचा रस्ते बांधकाम ठेकेदारावर कुठलाच परिणाम होत नसल्याचे ग्रामस्थ सांगतात.