शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
3
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
4
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
5
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
6
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
7
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
8
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
9
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
10
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
11
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
12
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
13
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
14
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
15
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
16
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
17
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
18
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
19
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
20
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाल्याने पसरते दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : मागील काही दिवसांपासून शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीसह परिसरातील मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. खरुजसदृश ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : मागील काही दिवसांपासून शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरीसह परिसरातील मोकाट कुत्र्यांना चर्मरोगाची लागण झाली आहे. खरुजसदृश जखमांनी माखलेले मोकाट कुत्रे गावात सैरावैरा फिरत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. यापासून संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त होत असून, नागरिकांच्या आरोग्याची चिंता वाढत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसले तरीही कुंकवाचे पाणी बाटलीत भरुन घरासमोर ठेवल्याने कुत्रे फिरकत नसल्याच्या समजातून अनेक घरांसमोर अशा बाटल्या दिसू लागल्या आहेत.            ग्रामीण भागात अनेक दिवसांपासून हा प्रकार निदर्शनास येत आहे. गावातील मोकाट कुत्र्यांच्या अंगावरील केस गळती होऊन बहुतांश मोकाट कुत्र्यांच्या संपूर्ण अंगावर जखमा झाल्याचे आढळून येत आहे. जखमांनी माखलेले हे मोकाट कुत्रे गावामध्ये सैरभैर फिरत असताना अनेक नागरिकांच्या घरामध्येसुद्धा प्रवेश करतात.  कुत्र्यांच्या अंगावरील जखमांमधून रक्तस्राव होत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. चर्मरोगाची लागण झालेल्या कुत्र्यांपासून लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे. कुत्र्यांच्या या संसर्गापासून परिसरातील मानवी आरोग्य धोक्यात येण्याची चिंता वाढली आहे. या बाबीकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष घालून या रोगी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. या कुत्र्यांच्या त्रासापासून बचावासाठी महिला दारात प्लास्टिकच्या बाटलीत कुंकवाचे पाणी भरून ठेवत आहेत. गेल्या वर्षापासून ग्रामीण भागात कुत्र्यांसाठी हा नवा फंडा अवलंबला जात आहे. त्यामुळे बहुतांश घरासमोर लाल रंगाच्या बाटल्या ठेवल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ही बाटली पाहून कुत्रे फिरकत नसल्याचे महिलांचे म्हणणे आहे; परंतु या प्रकाराचा या मोकाट कुत्र्यांवर कोणताही परिणाम झाल्याचे सध्या तरी दिसून येत नाही.

मानवी आरोग्याला धोका होण्याची शक्यतामागील काही दिवसात ब्राह्मणपुरी परिसरात या मोकाट कुत्र्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मोकाट कुत्र्यांच्या अंगावर आलेल्या या चर्मरोगाचा संसर्ग पसरुन मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे मोकाट कुत्र्यांचा संपर्क टाळावा, तसेच प्रत्येकाने घरात पाळीव कुत्रे असतील तर त्यांना अँटीरेबीज आणि इतर लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. यामुळे कुत्रे पिसाळण्याची व त्यांना इतर रोगाची लागण होण्याची शक्यता कमी असते.