शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भूसंपादन करताना शेतकऱ्यांची दिशाभूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST

याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून जमीन भूसंपादनाबाबत चौकशी केली असता शेतकऱ्यांना खुलासा न करता व भूसंपादित जमिनीचे प्रस्ताव ...

याबाबत संबंधित विभागाकडे लेखी तक्रार करून जमीन भूसंपादनाबाबत चौकशी केली असता शेतकऱ्यांना खुलासा न करता व भूसंपादित जमिनीचे प्रस्ताव तयार न करता उडवाउडवीची उत्तर देऊन शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार मोबदला न देता आर्थिक नुकसान करीत आहे. केंद्रीय दळणवळण विभाग मंत्रालयाचे भूसंपादित जमिनीचा मोबदला देण्याकामी यापूर्वीचे आदेश करून शेतकऱ्यांचे शोषण व पिळवणूक न करता परिपत्रकाप्रमाणे टीएलआर विभागाकडून सविस्तर मोजणी करून मोजणी सीटनुसार व प्रचलित बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई मोबदला देण्याचे स्पष्ट आदेश असताना या भागातील शेतकऱ्यांसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग नंदुरबार व जिल्हा भूसंपादन अधिकारी यांनी नियमानुसार कोणतीही कारवाई न करता प्रस्ताव विचाराधीन ठेवले आहेत. या भागातील शेतकरी आधीच कर्जबाजारी असून अल्पभूधारक आहेत. शासनाने सहमती न घेता परस्पर जमिनी संपादित करून चौपदरीकरणाचे काम सुरू करून अन्याय केला आहे. तसेच राज्य महामार्ग प्रकाशा ते तोरणमाळ दरम्यान रस्ता चौपदरीकरण करण्याच्या कामाबाबत काथर्दे दिगर, ता.शहादा येथील अनेक शेतकऱ्यांनी २४ ऑक्टोबर २०२० रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती. संबंधित प्रकरणातील दखल घेऊन १२ नोव्हेंबर २०२० रोजी तक्रारदार शेतकरी, तहसीलदार व कार्यकारी अभियंता यांच्यासह रस्ता कामाचे ठेकेदार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सर्व बाबींवर चर्चा होऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून हा रस्ता नकाशा अधिकृत आहे की नाही याबाबत खात्री करून चौकशी करण्याचे ठरले होते. तसेच सर्व शेतकऱ्यांनी सर्व रस्त्यालगत असणाऱ्या शेतीची मोजणी करून देण्याची मागणीही केली होती. ही बैठक होऊन दोन महिने होऊनही संबंधितांकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. माहितीच्या अधिकारात मागितलेली माहितीही सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेली नाही. त्यामुळे रस्ता ठेकेदारास कोणतेही आदेश नसल्यामुळे अर्धवट काम केल्याने रस्त्याचा वापर करणे अत्यंत त्रासदायक झाले असून शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. रस्त्यावर उडणाऱ्या धुळीमुळे पिके खराब होत आहेत. त्यात शेतकऱ्यांचे आतापावेतो सुमारे १५ लाखांचे नुकसान झालेले आहे. म्हणून संबंधितांनी सहानुभूतीने विचार करावा व शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी नंदुरबार जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे, असे काथर्दे दिगर येथील सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व गावातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.