शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
3
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
4
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
5
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
6
"ट्रम्प कोण ठरवणारे?" पेजेशकियान यांचा थेट सवाल; अणुकार्यक्रमावरून अमेरिका-इराण पुन्हा आमनेसामने
7
Google Chrome वापरताय? सावधान! एका क्लिकमध्ये हॅक होऊ शकतो तुमचा संगणक
8
KKR vs RR : जोफ्रा आर्चरची अनोखी 'हॅटट्रिक'! मोहम्मद शमीच्या विक्रमाशी बरोबरी
9
काय सांगता..! तब्बल 400KM रेंज; 'या' कंपनीने लॉन्च केली दमदार EV स्कूटर, जाणून घ्या किंमत
10
भरवाळवंटात इलेक्ट्रिक कार टेस्लाची बॅटरी संपली, मग 'या' पठ्ठ्यानं असा केला जुगाड; वाचा थरारक अनुभव
11
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
12
२६४ धावांची खेळीच नाही..., तर रोहित शर्माचा हा 'विराट' विश्वविक्रम मोडणंही जवळपास अशक्यच, कधीतरीच घडतो असा 'चमत्कार'!
13
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
14
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
15
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
16
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
17
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
18
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
19
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
20
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात सुक्ष्म सिंचन क्षेत्र वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन सुविधा वाढविण्यावर भर द्यावा आणि वनपट्टयात बांधलेल्या विहिरींसाठी वीज कनेक्शन देण्यासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन सुविधा वाढविण्यावर भर द्यावा आणि वनपट्टयात बांधलेल्या विहिरींसाठी वीज कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करावा असे निर्देश आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी दिले.खरीप हंगाम आढावा व नियोजन बैठक पालकमंत्री अ‍ॅड.पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज मिळवून देण्यासाठी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात यावी. कापूस खरेदी वेळेवर सुरू होईल यासाठी तातडीने उपाययोजना करावी. शेतकºयांना खते, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठा वेळेवर मिळतील यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी सांगितले.जिल्ह्यातील बंधाºयांच्या दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण होईल याचे नियोजन करावे. लघु पाटबंधारे विभागाच्या बंधाºयांच्या दुरुस्तीसाठीचे अंदाजपत्रक त्वरीत सादर करावे, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या. खरीप हंगाम २०२०-२१ साठी एकूण ३८ हजार ६६८ क्विंटल बियाण्यांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली होती. त्यानुसार बियाणे उपलब्ध होणार आहे.महाबीजमार्फत बियाण्याची उपलब्धता होणार आहे. खरीप हंगामासाठी १ लाख १८ हजार १६० मे.टन खतांची मागणी करण्यात आली असून १ लाख १० हजार ८७५ मे.टन खते उपलब्ध होणार आहेत.किटकनाशके फवारणीबाबत शेतकºयांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. कृषी निविष्ठा विषयक तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी कापूस पिकाबाबत शेतकºयांमध्ये जागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.बैठकीला सर्व लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.