शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

व्यापाऱ्याचे पैसे लुटायला गेले आणि किराणा घेवून पळाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चौघांनी व्यापाºयाला लुटण्याचा प्लॅन केला, परंतु व्यापाºयाकडे पैसे न मिळाल्याने त्याच्याकडील साखर, शेंगदाणे व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चौघांनी व्यापाºयाला लुटण्याचा प्लॅन केला, परंतु व्यापाºयाकडे पैसे न मिळाल्याने त्याच्याकडील साखर, शेंगदाणे व विडी घेवून चौघे पसार झाल्याची घटना धुळवद ते निझर रस्त्यावर ११ रोजी सकाळी घडली. यापैकी दोघांना नंदुरबार उपनगर पोलिसांनी अटक केली आहे.शंकर लक्ष्मण पवार, रा.सरोजनगर, नंदुरबार, विशाल शैलेंद्र लहाने, रा.जिल्हाधिकारी वसाहत, नंदुरबार, विनोद पाडवी, रा.इंदिरानगर भिलाटी, नंदुरबार व आणखी एकजण अशी संशयीतांची नावे आहे. त्यापैकी शंकर पवार व विशाल लहाने यांना अटक करण्यात आली आहे.पोलीस सूत्रांनुसार, धुळवद येथील किराणा व्यावसायिक स्वरूपसिंग हावलू पाडवी हे निझर येथून किराणा माल भरून धुळवदकडे येत असतांना गावानजीक नाल्याजवळ त्यांना चौघांनी अडविले. खिशातील सर्व पैसे देण्याची मागणी केली. मारहाणही केली. व्यापारी पाडवी यांच्याकडे पैसे सापडले नाही, त्यामुळे चौघांनी त्यांच्याकडील १२०० रुपये किंमतीची साखर, शेंगदाणे व विडी घेवून पोबारा केला.पाडवी यांनी गावात येवून हकीकत सांगितली. आजूबाजूला चौघांचा शोध घेतला असता ते सापडले नाही. त्यामुळे उपनगर पोलिसात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवून शंकर पवार व विशाल लहाने यांना अटक केली. त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किंमतीची दुचाकीही जप्त केली. तपास फौजदार प्रवीण पाटील करीत आहे.दरम्यान, या जागेवर यापूर्वी देखील अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत.