खेतिया येथे वैश्य समाजाचे संमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:33 IST2021-01-19T04:33:05+5:302021-01-19T04:33:05+5:30

संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष राजेश गर्ग, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री गुप्ता, युवा आघाडीचे विभागीय अध्यक्ष हेमंत अग्रवाल, चेतन ...

Meeting of Vaishya Samaj at Khetia | खेतिया येथे वैश्य समाजाचे संमेलन

खेतिया येथे वैश्य समाजाचे संमेलन

संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष राजेश गर्ग, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा गायत्री गुप्ता, युवा आघाडीचे विभागीय अध्यक्ष हेमंत अग्रवाल, चेतन सिंहल, संजय गुप्ता, अमन अग्रवाल, समाजाचे संरक्षक महिपाल नाहर व कमलकिशोर अग्रवाल उपस्थित होते. या वेळी समाजाच्या वार्षिक दिनदर्शिकेचे प्रकाशन करून नवीन सदस्यांना ओळखपत्र वाटप केले. तसेच खेतिया वैश्य समाजाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात शहराध्यक्षपदी संतोष सुराणा, महिला आघाडीच्या शहराध्यक्षपदी प्रेमलता माहेश्वरी, विधी प्रकोष्ठ (वकील) सेल ॲड. कपिलकुमार शहा, अभियंता प्रकोष्ठ सेल (इंजिनिअर) महेंद्रकुमार नाहर, मीडिया (प्रसिद्धी) सेल हार्दिक जैन, एज्युकेशन (शिक्षण) सेल संतोषी बोथरा व सांस्कृतिक प्रकोष्ठ सेल हंसा श्रीमाली यांची सर्वानुमते निवड झाली. सूत्रसंचालन समाजाचे जिल्हा सरचिटणीस हिरालाल संचेती यांनी केले तर आभार युवा आघाडीचे अध्यक्ष मनोज बोहरा यांनी मानले.

Web Title: Meeting of Vaishya Samaj at Khetia